नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली असून याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर आला आहे.
दिल्ली मेट्रो स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पत्नी आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं. पत्नी प्रियकराचा हात हातात घेऊन फिरत असताना पती तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, पतीला पाहिल्यानंतर सुरुवातीला घाबरलेल्या पत्नीने नंतर मात्र त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या पतीला शिवीगाळही केली.
पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओ शूट करताा पती मध्येच एका व्यक्तीला विचारतो, ‘काका, मला इकडे कोणाची मदत हवी असेल तर काय करू? कारण ती बघा माझी पत्नी आहे आणि मला सोडून पळून गेली आहे. तिच्या प्रियकराचा हात धरुन फिरत आहे. मी अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत आहे. आज ती रंगेहात सापडली आहे.’ मेट्रो फलाटावर चालत असलेली व्यक्ती पाठलाग करणाऱ्या पतीला पत्नीला फोन करण्याचा सल्ला देते. त्यावर ती माझा फोन घेत नाही. मला ब्लॉक केलं आहे आणि इथे प्रियकरासोबत फिरत आहे, असं उत्तर पती देतो. तेव्हा एक जण पतीला पुढे जाऊन पत्नीला रोखण्याचा सल्ला देतो. तितक्यात महिला तिच्या सोबत असलेल्या तरुणासोबत एका दुकानात थांबते. तेव्हा पती तिला मागून आवाज देतो. झालं का फिरुन, असा प्रश्न पती विचारतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: अमेरिकेत भारतीयांची तांदूळ खरेदीसाठी झुंबड; नेटकऱ्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाला दिला दोष
पतीला पाहताच महिला गडबडून जाते. तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो. पण काही क्षणांतच ती प्रत्युत्तर देते. हो झालं फिरुन, मग काय झालं?, असा प्रतिप्रश्न महिला करते. त्यावर तुझा व्हिडीओ शूट केला आहे. आता कोर्टात ये तू, असं म्हणतो. यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू होतो. नेटकऱ्यांनीही यावर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.