करोना काळात प्रत्येकाचेच आयुष्य बदलून गेले आहे. घरी राहून देखील आपण अनेक गोष्टी करू शकतो याची उत्तम प्रचिती जगभरातील लोकांना आली आहे. अनेकांनी घरबसल्या अनेक कामं केली, अनेकांनी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रत्यत्न केला. परंतु एका कुटुंबाने या दोन वर्षांमध्ये घरबसल्या एक असामान्य गोष्ट करून दाखवली आहे. या कुटुंबाने युट्युबच्या मदतीने घरीच एक विमान बनवलं आहे. हे कोणतंही खेळण्यातलं विमान नसून चक्क हवेत उडणारं विमान त्यांनी बनवलं आहे.

संपूर्ण परिवाराने मिळून बनवलं विमान

३८ वर्षीय अशोक, त्यांची पत्नी अभिलाषा, ६ वर्षाची मुलगी तारा आणि ३ वर्षाची मुलगी दिया या चौघांनी मिळून या विमानावर काम केलं आहे. अशोक एक कुशल वैमानिक असून इंजिनिअर सुद्धा आहेत. आपल्या कुटुंबासोबत मिळून त्यांनी २ वर्षात हे विमान तयार केले आहे.

पत्नीला विकत घ्यायचं होतं एअरक्राफ्ट

हे कुटुंब इंग्लंडमध्ये एसेक्स येथे राहते. अशोक यांची पत्नी अभिलाषा यांना एअरक्राफ्ट विकत घेण्याची इच्छा होती. पण त्या ते विकत घेऊ शकल्या नाहीत. तेव्हा अशोक यांनी स्वतः एक एअरक्राफ्ट बनवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने देखील यात त्यांना सहकार्य केले. त्यांनी युट्युबच्या मदतीने या चार सीटच्या एअरक्राफ्टची निर्मिती केली आहे. २०२० साली त्यांनी यासाठी आवश्यक असणारे पार्टस मागवून घेतले आणि करोना काळात यावर काम करण्यास सुरुवात केली.

Drone Delivery: आता ड्रोन करणार फूड डिलिव्हरी; ‘या’ पाच शहरात झाली यशस्वी चाचणी

यासाठी किती खर्च झाला ?

करोना काळात कोणी जेवण बनवण्याचे व्हिडीओ पोस्ट करत होत तर कोणी घरच्या घरी व्यायाम करत होतं, तेव्हा हे कुटुंब एअरक्राफ्ट बनवत होतं. हे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी त्यांना जवळपास १.५७ कोटी इतका खर्च आला आहे. इथे-तिथे विनाकारण खर्च होणार पैसे त्यांनी या कामासाठी वापरला असल्याचं अशोक यांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिलाषाने यांनी सांगितले की त्या आणि अशोक ऑफिसचे काम संपल्यानंतर हे एअरक्राफ्ट बनवण्याच्या कामाला लागायचे. त्यांनी आपल्या घरामागच्या गार्डनमध्येच हे एअरक्राफ्ट तयार केले आहे. दिवसाचे ६ तास ते यावर काम करायचे. लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते या विमानाने फिरायला जाण्याचा बेत आखणार आहेत.