सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टीने व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. या व्हायरल गोष्टीमधील काही गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात तर काही घटना अनेक प्रश्न उभे करून जातात. अमेरिकेच्या अलाबामा राज्यात मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे. अलाबामाच्या क्रेओला येथे गुप्तपणे जोडप्याच्या घरी राहत असलेल्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या प्रियकराने गोळ्या घातल्या. क्रेओला येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्यावेळी मोबाइल काउंटी शेरीफ ऑफिसने (MCSO) प्रतिसाद देत घटनास्थळी दाखल झाले. जेव्हा अधिकारी आले, तेव्हा त्यांना गोळी लागलेली फ्रँक रीव्स आणि मायकेल अमाकर अशी दोन माणसे सापडली. दोन्ही व्यक्तींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले जेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
काय झालं नक्की?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घराचे मालक रीव्स आहे. त्याला अमाकर (बॉयफ्रेंड) ने छातीवर गोळी मारली आणि रीव्ह्सने अमाकरला अनेक गोळ्या मरल्या. अधिकाऱ्यांनी असेही नमूद केले की घराच्या मालकाची पत्नी ट्रेसी रीव्ह्सने तिच्या पतीला सांगितले होते की एक घुसखोर (अमाकर) त्यांच्या घरात आहे. गुप्तहेरांना हे देखील कळले की ट्रेसी रीव्स अमाकरला ओळखतात आणि कथितपणे त्याच्याशी एक वर्षापासून संबंध आहेत.
बायकोनेचं दिली होती परवानगी
एमसीएसओचे कॅप्टन पॉल बर्च यांनी सांगितले की, “ती त्याला काही दिवस घरात राहण्याची परवानगी देत होती, त्याला अन्न पुरवत होती, खोलीत लघवीच्या बाटल्या होत्या ज्यामुळे तो तिथे थोडा वेळ होता असे सूचित होते.”
नवऱ्याला देत होते नशेचे औषध
तथापि, फ्रँक रीव्हस यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. डेप्युटीज म्हणाले की ट्रेसी रीव्ह्स आणि अमाकर दोघेही मेथॅम्फेटामाइन वापरत होते. घटनास्थळी मुलाखतीच्या दरम्यान, डेप्युटीज म्हणाले की त्यांना असे वाटते की ट्रेसी नशेच्या स्थितीत आहे.