Husband wife dance video: नवरा-बायकोचं नातं म्हणजे प्रेम, रुसवे-फुगवे, आणि अधूनमधून होणारी गंमतीशीर भांडणं या सगळ्याचं सुंदर मिश्रण म्हणजेच लग्न! हे नातं कधी विनोदी, कधी मिश्कील, तर कधी गोडसर भांडणांनी भरलेलं असतं. मात्र जिथे नवरा हौशी असतो तिथे नेहमीच बायको आनंदी असते. याचंच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे.

सध्या सोशल मीडियावर या नवरा-बायकोच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पती-पत्नीचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून सारेच थक्क झाले असून, टॅलेंट असेल तर ते जगासमोर येतेच याचेच हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशाच पती पत्नींच्या व्हिडीओंनी धुमाकुळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नामध्ये नवरा बायकोनं असा डान्स केलाय की सगळे नातेवाईक बघतच राहिले आहेत. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. शेवटी नवऱ्यानं आपल्या बायकोला उचलूनही घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pratz_2301 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.