नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली असून याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर आला आहे.

हायव्होल्टेज ड्रामा

नवरा बायको एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. बायको म्हणते माझे आई-वडील जमीनदार आहेत, आमचा खर्च आम्ही स्वतः उचलू शकतो. त्याचबरोबर महिला आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप करत आहे. महिलेचे म्हणणे आहे की तिचे कुटुंब त्याच्यापेक्षा खूप चांगले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती महिला तिच्या प्रियकराला मेसेज करत होती, मात्र तेवढ्यात तिचा नवरा तेथे पोहोचतो आणि तिला रंगेहात पकडतो. यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु होते. प्रकरण इतके वाढले की दोघेही एकमेकांचा भांडताना व्हिडीओ बनवायला लागले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भारतीय बनावटीची ‘खाट’ अमेरिकेत लोकप्रिय, किंमत ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.