Husband Wife Fight Video : पती-पत्नीत अनेकदा विविध कारणांवरुन वाद होतात. या वादात दोघं एकमेकांवर शाब्दिक टीका करतात किंवा हात उचलतात. बऱ्याचदा रस्त्यावरही जोडपं भांडताना दिसतात, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्व पुरुष समाजाला धक्का बसेल. कारण- यात बाईकवरून जाणाऱ्या जोडप्यात कोणत्या तरी कारणावरून वाद होतो. हा वाद इतका टोकाला जातो की, पत्नी चालत्या बाईकवरच पतीसह असं काही वागते की, ते पाहून धक्का बसेल.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं बाईकवरून जात आहे. यावेळी पती बाईक चालवतोय, तर त्याची पत्नी मागे बसली आहे. अचानक ती पत्नी पतीला जोरजोरात कानशिलात मारू लागते. आधी चक्क दोन हातांनी त्याच्या गालांवर जोरात कानशिलात मारते. त्यानंतर ती हात पुढे करून, त्याच्या पोटावर किंवा छातीवर मारू लागते. काही सेकंद ती शांत बसते. त्यानंतर पुन्हा त्याच्या तोंडावर जोरजोरात मारू लागते. अशा प्रकारे दर काही सेकंदांनी ती त्याला मारताना दिसतेय. यावेळी मागील कारमधून येणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या जोडप्यामध्ये नेमका कशावरून वाद झाला हे समोर आलेलं नाही, पण यात पत्नी ज्याप्रकारे पतीला मारतेय ते फार धक्कादायक आहे.
पती-पत्नीतील वादाचा हा व्हिडीओ @askshivanisahu नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘हे सर्व पाहून पुरुष समाज घाबरून जाईल.’ हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, आजकाल लोकांना काय बोलावं हे समजत नाही. दुसऱ्याने लिहिलेय की, विचार करा की जेव्हा एखादा पुरुष असे करेल तेव्हा काय होईल. तिसऱ्याने लिहिलेय की, भावाचा अपमान आहे हा. शेवटी एकाने लिहिलेय की, आजकाल पुरुष समाज खरंच धक्क्यात आहे.