कुत्र्याची आई हताशपणे रडत असते आणि तिच्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न हैदराबाद परिसरातील रहिवाशांना काळजीत टाकतो. परंतु शहरातील प्राणी कार्यकर्त्यांच्या एका गटाच्या प्रयत्नानंतर आई आणि पिल्लांची पुन्हा भेट होते. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हृदयद्रावक बचावाचा हा व्हिडीओवर नेटिझन्सनी बचावकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अॅनिमल वॉरियर्स कन्झर्वेशन सोसायटी (AWCS) च्या सदस्यांनी मॅनहोलमधून खाली पडलेल्या आणि खोल नाल्यात अडकलेल्या पिल्लांच्या मदतीसाठी बोलावण्यात आले. शाईकपेटमधील रहिवाशांनी आईला नाल्याभोवती भटकताना आणि एका छोट्या उघड्याद्वारे त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतांना पाहिले, त्यांनी योग्य मदत घेण्याचे ठरवले.

असं वाचवलं पिल्लांना

जेव्हा AWCS ची टीम आली, तेव्हा त्यांनी पाहिले की लहान उघड्याद्वारे पिल्लांना बाहेर काढणे शक्य नाही. “म्हणून आम्ही काँक्रीट तोडणारी मशीन भाड्याने घेतली आणि रस्त्यावर एक छिद्र केले,” गटाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले. व्हिडीओमध्ये एक माणूस टॉर्चसह खाली उतरताना आणि १० तासांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांचा शोध घेत असल्याचे दिसून आला. एक एक करून, पाच “भुकेलेले आणि घाबरलेले” कुत्रे उंच नाल्याबाहेर सुरक्षितपणे आणले गेले आणि त्यांची भेट पुन्हा आईशी झाली.

आईनेही मानले आभार

“त्यांनी खूप वेळानंतर आईचे दूध प्यायले! ” गटाने सागितलं. त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, गटाने पुढे सांगितले की आई नंतर त्यांच्या बाळांना वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आली. या पिल्लांना वाचवण्यासाठी आणि  आम्हाला मदत करणाऱ्या नारायणम्मा अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे आभार. त्यांनी असेही सांगितले की त्यांना दत्तक घेण्यास कोणाला स्वारस्य असल्यास त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.

सोशल मीडीयावरील लोकांना प्राण्यांना वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न आवडले. नेटीझन्सनी त्याचं भरभरून कौतुकही केलं आहे. हा व्हिडीओ २.८ मिनिटांचा आह. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.अनेकांना आशा होती की कुत्र्यांना लवकरच त्यांचे कायमचे घर मिळेल.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?