इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि काही काळ तेथे काम केलेल्या एका भारतीय पदवीधर वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यूकेमधील नोकरीची एक संधी हुकल्यामुळे त्याला भारतात परत यावे लागले, याबद्दल त्याने या पोस्टमध्ये त्याची वेदना मांडली आहे.
चार वर्षे यूकेमध्ये राहिलेल्या या वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये यूकेमधील जीवनाबद्दल भाष्य केले आहे. त्याने म्हटले की, परदेशातील जीवनात त्याला स्थिरता, आनंद आणि संतुलन मिळाले होते. मात्र आता त्याने हे सर्व गमावल्याची भीती त्याला वाटत आहे.
“मी मँचेस्टरमध्ये माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले, तिथे चार वर्षे राहिलो आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी केली. मी परत जाण्याच्या तयारीत असतानाच, कंपनीची कामगिरी चांगली होत नसल्यामुळे त्यांनी नोकरीची ऑफर मागे घेतली,” असे या रेडिट वापकर्त्याने लिहिले.
कंपनीने त्यांची ऑफर अचानक मागे घेतल्याने काहीतरी गमावल्याचे दुख: आणि त्यावेळी बसलेला धक्का याबद्दल या वापरकर्त्याने लिहिले आहे. “जेव्हा मला आम्ही काहीही करू शकत नाहीत, असं सांगणारा फोन आला तेव्हा खरंच असं वाटलं की माझं जग कोसळत आहे. मी तिथे कामावर परत जाणार याची खात्री असल्याने, मी दुसरीकडे कुठेही नोकरीसाठी अर्ज करत नव्हतो,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.
या वापरकर्त्याने सांगितलं की आता तो त्याच्या पालकांसह भारतात परत आला आहे, हा बदल खूपच मोठा आणि निराशाजनक असल्याचे सांगितले. “मला माझं यूकेमधील जीवन खूप आवडायचं. माझी चांगली मैत्री जमली होती, चांगले संबंध होते आणि स्वतःची काळजी घेत मी चांगले संतुलन राखले होते,” असे त्याने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
‘मला वाटतं की मी सर्वकाही गमावलं’
भारतात परतलेला हा रेडिट वापरकर्ता म्हणतो की त्याला सध्या बदललेली लाईफस्टाईल आणि गमावलेलं स्वातंत्र्य याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. ” आता मी माझ्या पालकांसह परत आलो आहे आणि मला वाटत राहतं की मी सर्वकाही गमावले आहे. माझे स्वातंत्र्य आणि मेहनत उगाच होती.”
असे असले तरी कुटुंबासोबत असण्याचे आणि व्हिसा टाळणे किंवा भाड्याची समस्या नसण्याचे फायदे असले तरी हे असे जीवन आपल्याला असल्याचे त्या यूजरने स्पष्ट केले. “होय, मला माहित आहे की इथे मला भाडे/स्पॉन्सरशिप इत्यादीची काळजी करावी लागणार नाही, पण मला माझ्यासाठी हवे आहे ते हे नाही,” असे त्याने सांगितले.
या पोस्टमध्ये भारतातील वर्क कल्चर आणि जॉब प्रॉस्पेक्ट याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “माझ्या माहितीनुसार भारतात वर्क-लाईफ बॅलेन्स हे शून्य आहे आणि पदवीधरांना अतिशय कमी पगार मिळतो. त्यात भर म्हणून यूकेच्या तुलनेत येथील जीवनाचा दर्जा चांगला नाही,” असेही त्या युजरने म्हटले आहे.
इतकेच नाही तर या यूजरने घरी परतल्यानंतर त्यांचे नातेसंबंध देखील संपल्याचे सांगितले. “माझ्या मित्रांना मी आता परत कधी भेटेन, हे मला माहीत नाहीये आणि मी परत कधी यूकेला येईन याबद्दल निश्चित माहिती नसल्याने माझ्या बॉयफ्रेंडने माझ्याशी ब्रेकअप केले,” असे त्या पोस्टमध्ये लिहिले होते.
यूजरने सांगितले की दुबई किंवा भारतातील मोठ्या शहरात नोकरी शोधत आहे, पण त्याला सकारात्मक राहण्यात अडचणी येत आहेत. “मी दुबईत किंवा भारतातील कोणत्याही मोठ्या शहरात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला माहीत आहे की परिस्थिती आधीसारखी नसेल,” असे त्याने लिहिले.
“मला थोडा आधार/दिलासा हवा आहे, की पुढे परिस्थिती सुधारेल आणि मी पुन्हा इथून स्थलांतरित होऊ शकेन. मला तिथली स्वच्छ हवा, निसर्ग, स्वातंत्र्य, थर्ड स्पेसेस आणि वर्क लाईफ बॅलेन्सची आठवण येत आहे. मला वाटत नाही की मला त्या इथे मिळतील. मला आता हार मानावीशी वाटत आहे,” असे म्हणून त्या वापरकर्त्याने त्याची पोस्ट संपवली.
