Business Cards For Flirting : सध्या ऑनलाइनच्या जमान्यात रोमँटिक पार्टनर शोधण्यासाठी लोकं डेटिंग अॅप्सचा वापर करतात. फोटो आणि प्रोफाइल पाहून आवडलेल्या व्यक्तीशी ऑनलाइन चॅट करतात, यानंतर भेटतात. अशा प्रकारच्या अॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला जवळच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीशी देखील ऑनलाइन बोलता येते. या अॅप्सची लोकप्रियता वाढत असतानाही काही लोक डेटिंगसाठी जुनीच पद्धत वापरताना दिसतात. जसे की, पार्क, बार किंवा क्लबमध्ये भेटणे. पण एका महिलेने तिला आकर्षक वाटणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे.
आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी महिलेला केलेला हा अनोखा जुगाड आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिरियम मकालिया व्हॅन्स असे या महिलेचे नाव असून ती न्यूयॉर्क येथील ब्रुकलिनची रहिवासी आहे. तिने चक्क डेटिंगसाठी चक्क एक फ्लर्टिंगसाठी बिझनेस कार्ड छापले आहे.
या अनोख्या कार्डचा फोटो तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. कार्डवर तिने सुरुवातीला “हाय, मला वाटते की तू सुंदर आहेस,” असे लिहून पुढे स्वत:चा परिचय दिला आहे. ज्यात लिहिले की, “माझे नाव मिरियम आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी देखील सुंदर आहे, तर माझ्याशी संपर्क साधा. तिने यात स्वत:चे ट्विटर हँडल आणि फोन नंबर देखील शेअर केला आहे.
व्हॅन्सने कॅप्शनमध्ये डेटिंग अॅप्सबद्दल आपला असंतोष व्यक्त करत लिहिले की, “डेटिंग अॅप्स खूप वाईट आहेत मला बिझनेस कार्ड मिळाले ते पण फ्लर्टिंगसाठी.” ऑनलाइन डेटिंगच्या बर्याचदा अवैयक्तिक जगात लोकांना भेटण्याचा हा चांगला आणि नवा मार्ग आहे.