सोशल मीडियावर रोज नव नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच शेजाऱ्यांसोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध असावेत असे म्हटले जाते. कारण एखादी आपत्कालीन स्थिती ओढावल्यास आपण सर्वात प्रथम त्यांना बोलावू शकतो. अशातच गरजेचे आहे की, त्यांच्यासोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध जपले पाहिजेत. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, असे शेजारी नकोच रे देवा. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत.

पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये वाद

शेजाऱ्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वीही पाहिले आहेतच. छोट्या छोट्या कारणांवरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होत असतात, आणि कधी कधी याच वादाचं रुपांतर हाणामारीतही होतं. असाच एक दिल्लीतील दोन शेजाऱ्यांमधील भांडणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्लीच्या संत नगर भागात दोन शेजाऱ्यांची भांडणं झाली. पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. शनिवारी दिल्लीच्या संत नगर भागात पार्किंगच्या वादावरून दोन शेजारी एकमेकांशी भिडले. कॉलनीच्या रस्त्यावर एका व्यक्तीने गाडी उभी केली होती, यावरून दोघांमध्ये जुंपली. वादावादी इतकी वाढली की वाद विकोपाला गेला आणि दोन्ही कुटुंबात हाणामारी सुरू झाली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने कार पार्क केली आहे, यावरुन भांडण सुरु असतं. यावेळी त्याठिकाणी एक वृद्ध सरदारजी अचानक हातातील काठीने त्या व्यक्तीला बेदम मारु लागतात. यावेळी त्या व्यक्तीची पत्नी विरोध करते मात्र ते तिलाही मारतात. तसेच त्या वृद्ध सरदारजींच्या कुटुंबातील सदस्यही त्या दोघांना मारु लागतात. या मारहाणीत त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकला असता. मात्र त्या सरदारजींना कोणीही रोखत नव्हते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पावसाचा हाहाकार! नदीच्या प्रवाहासारखं रस्त्यावरुन वाहतंय पाणी, बाईकसह माणसं गेली वाहून, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. काहीजण वृद्ध सरदारजींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत आहेत. तर काही जणांनी गाडी नीट पार्क करायला हवी होती असा सल्ला देत आहेत.