Shocking viral video: लग्नात हुंडा देण्याची आणि घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हुंडापद्धत भारतातील एक जाचक आणि महिलांसाठी अन्यायकारक पद्धत आहे. अनेकदा या हुंड्यापायी महिलांचा छळ होतो तर काही जणींचा हुंड्यापायी मृत्यूही झालेला. लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा एक गुन्हा मानला जातो. मात्र अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा पाहायला मिळते. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये नवऱ्यानं १० लाखांच्या हुंड्यासाठी बायकोसोबत काय केलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा एक गुन्हा मानला जातो. मात्र अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा पाहायला मिळते. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

ही धक्कादायक घटना जालौनमधील एका गृहनिर्माण संकुलात घडली आहे. यावेळी सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना, काही महिन्यांनंतर पतीने त्याच्या कुटुंबीयांनी प्रीतीकडे दहा लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला घराच्या वरच्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर असलेल्या वाहनांवर जोरदार कोसळली जाते. त्यानंतर सर्वांची गर्दी महिलेच्या मदतीसाठी झालेली दिसत आहे. या घटनेत महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ @Anushqq नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. एकानं म्हंटलंय की, “हे फार भयंकर आहे, महिलेनं याविरोधात वेळीच आवाज उठवायला हवा” दुसरा म्हणतो, “या संपूर्ण कुटूंबावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.” तर आणखी एकानं, “बापरे हे लोक कधी सुधारणार काय माहिती”