एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो ८ मार्च रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला. २४ तासात हा व्हिडीओ किती लोकांनी पाहिला आणि लोकांकडून किती प्रतिक्रिया आल्या याचा अंदाजही लावता येणार नाही. असं काय आहे या तरूणीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये जाणून घेऊयात.

२४ तासात लाखो व्ह्यूज

हा व्हिडीओ फक्त आणि निव्वळ ७ सेकंदांचा आहे. या व्हिडीओला २४ तासात ६.४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते तर आतापर्यंत व्हिडीओला ११.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ११२.१ हजार रिट्विट्स आणि ६६२.१ हजार लाईक्स मिळाले आहेत.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

काय आहे व्हिडीओमध्ये?

@staycjerry या ट्विटर हँडलवरून ८ मार्च रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आता या व्हिडीओचा इंटरनेटवर सर्वाधिक लाइक केलेल्या व्हिडीओंच्या यादीत समावेश झाला आहे. या क्लिपमध्ये मुलगी थ्रीडी सीटवर बसलेली दिसत आहे. थ्रीडी सीटवर बसताना लावायचा चष्माही बसवण्यात आला आहे. थ्रीडीचा अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये या प्रकारचा सेटअप सहज मिळेल.

…आणि व्हिडीओ व्हायरल झाला

थ्रीडीचा अनुभव खूप वेगळा असतो. पण या मुलीसोबत असं काही घडलं नाही. ती थ्रीडी खुर्चीवर बसताच आणि खुर्ची फिरवण्याऐवजी ती बरीच मागे फिरली आणि थेट जमिनीवर पडली.

(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)

(हे ही वाचा: निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंत झाला भावनिक; लाइव्हचा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरची कमेंट व्हायरल

विशेष म्हणजे या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणाऱ्या युजरची फक्त कमेंट व्हायरल होत आहे, हे फार कमी वेळा पाहायला मिळते. युजरने लिहिले – दीदी ५ सेकंदात ३D वरून ८D वर गेल्या.