आजी म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेल्या वयस्कर महिलेचा चेहरा उभा राहतो. आपल्यापैकी अनेकांची आजी अशीच दिसतेही. पण गावाकडे राहणाऱ्या आजीबाईंना सहसा भाकरी चटणीशिवाय काही गोड लागत नाही. अनेकदा आजीबाईंना नवनवीन खाद्यपदार्थांबाबत माहितही नसते. तुम्ही पिझ्झा, बर्गर, सँडविच असे पदार्थ खायला दिले तर त्यांना ते अनेकदा त्यांना आवडत नाही कारण त्यांना त्याची सवय नसते. त्यांना नेहमीची भाजी-पोळी खाण्याची सवय असते. पण सर्वांच्या आजी अशा नसतात याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक लुगड नेसणाऱ्या आजीबाई चक्क हातात काटे-चमचा घेऊन स्टाईलमध्ये जेवण करताना दिसत आहे जे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

अनेकदा वयस्कर मंडळी नवीन गोष्टी स्वीकारत नाही मग ते विचार असो, कपडे असो किंवा खाद्यपदार्थ. त्यामुळेच नव्या पिढीचे विचार, आचार, कपडे आणि खाद्यपदार्थ त्यांना पटत नाही कारण वर्षानुवर्षे त्यांनी विचारांच्या प्रभावाखाली आयुष्य घालवले, जे कपडे परिधान केले, जे खाद्यपदार्थ खाल्ले त्यापेक्षा वेगळं असे काहीही अचानक समोर आले तर ते पटकन स्वीकारत नाही पण याचा अर्थ असा नाही कधीच स्वीकारत नाही. काही वयस्कर लोक याबाबत कट्टर असतात, त्यांना जुन्या परंपरा, विचार, राहणीमान, कपडे अशा नेहमीच्या गोष्टींमध्येच राहायला आवडते. पण काही वयस्कर लोक बदलासाठी हळू हळू तयार होतात. ते लोक हळू हळू नवीन गोष्टी समजून घेण्याचा आणि स्विकारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे त्यामुळे नव्या पिढीबरोबर त्यांचे नातं आणखी घट्ट होते. अशाच एका पुढारलेल्या विचारांच्या आजीबाईंचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक आजीबाई पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीनुसार वापरले जाणारे काटे -चमचे वापरून पनीरचे तुकडे करतात आणि काटे चमच्यानेच खातात. ही अत्यंत साधी गोष्ट आहे पण एखादी वयस्कर व्यक्ती हे करत आहे हे पाहून अनेक जण थक्क झाले आहे. आजींबाईंना आजच्या तरुण लोकांपेक्षा टेबलावर जेवण्याची शिष्टाचार जास्त चांगल्या पद्धतीने माहित आहे असे यातून दिसते. व्हिडिओ हा तरुणांना लाजवणार आहे ज्यांना अजूनही काटे चमच्याने जेवता येत नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आजीबाईंचे तोंडभरून कौतुक केले आहे. cricakash नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा आजीला शिष्टाचार तुमच्यापेक्षा जास्त चांगले पद्धतीने माहित असतात.”

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “माणसाने नेहमी शिकत राहण्याची आणि पुढारलेल्या विचारांचं असावं, याच आजी उत्तम उदाहरण आहेत आणि त्यामुळे त्या या वयातही आनंदी जीवन जगत आहेत.”

दुसऱ्याने लिहिले की,आज्जी माळकरी आहेत पनीर मस्त स्टाईल मध्ये खात आहेत”

तिसऱ्याने लिहिले की,”अरे हे लोक आपल्या बाप आहेत पण आपण यांना कमी समजतो”

चौथ्याने लिहिले की,”हे सगळे नातवंडे शिकवतात. खूप प्रेमळ वातावरण असेल घरात”

पाचव्याने लिहिले की,”आजीने नवीन जनरेशन मध्ये स्वतः ला फिट करुन घेतलंय.”