Viral video: चहासोबत गरमा गरम समोसे खायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्हालाही समोसा खायला आवडतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार घडला आहे. समोसा तयार करण्यासाठी लागणारे पीठ कामगार पायाने तुडवत, मळत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. उल्हासनगर पूर्वेतील परिसरातील हा व्हिडीओ आहे. लोकसत्ताच्या हाती हा व्हिडीओ लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न व भेसळ प्रशासनानं याची चौकशी सुरु केली आहे. हा किळसवाणा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगरमधील शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार काम करत आहेत. यावेळी बाहेरुन कुणीतरी याचा व्हिडीओ आहे. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरु असलेला हा प्रकार पाहून यापुढे समोसा, कचोरी खाताना अनेकजण नक्की विचार करतील.अशा प्रकारची घाणेरडे समोसे खाल्ल्याने जुलाब, उलटी, टायफाइड, कावीळ, अन्न विषबाधा इत्यादी आजार होऊ शकतात. त्यामुळे स्वच्छ आणि परवानाधारक ठिकाणीच असे खाद्य पदार्थ खावेत.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: धावती ट्रेन पकडताना तोल गेला अन् ‘ती’ फटीत पडली; मदतीसाठी ओरडत राहिली पण अखेर…

उल्हासनगर पूर्वेतील आशेळेगाव येथील १५ ते २० वर्ष जुने हरिओम मिठाईच्या दुकानात समोशे व कचोरीचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य बघून विठ्ठलवाडी पोलिसांनी झालेला प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकामुळे दुकानदाराने सोमवार रात्री पासून बंद केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी आशेळेगाव येथील हरिओम मिठाईच्या दुकानाची पाहणी करून विभागा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले.