Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. यामध्ये धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेनखाली गेली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी धावत रेल्वे प्लॅटर्मवर येते, तोपर्यंत ट्रेन सुरु झालेली असते. तरीही तरुणी जीव धोक्यात घालून धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो आणि ती पडते. यामध्ये दिसत आहे, सुरुवातीला ती प्लॅटफॉर्मवर फरपटत जाते त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या गॅपमध्ये पडते आणि ट्रेनखाली येते. हा व्हिडीओ बघूनच अंगावर काटा येतो. यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेले दोन तरुण तिला वाचवण्यासाठी पुढे जातात मात्र ते तरुणीला वाचवू शकले नाही. या अपघातात तरुणी थोडक्यात बचावली गेली असून तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ चिमुकल्या कुत्र्याची वाघाशी झुंज; कोण जिंकलं कोण हारलं? पाहा VIDEO

@HateDetectors नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्या आरपीएफ महिलेचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात.