in uttar pradesh woman bets self in game of Ludo after running out of money | Loksatta

Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

महिलेने स्वत:लाच डावावर लावल्यामुळे तिला नाईलाजास्तव घरमालकासोबत रहावं लागतं आहे

Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…
महिलेला लुडो खेळण्याचं इतकं व्यसन लागलं की या खेळात तिने आपली संपत्ती गमावली. (Photo : Indian Express)

कोणत्याही गोष्टीची सवय प्रमाणापेक्षा जास्त झाली की ती हानिकारक ठरते. सध्या एका महिलेची अती प्रमाणात जुगार खेळण्याची सवय तिला एवढी महागात पडली आहे की, तिला इच्छा नसताना घरमालकासोबत रहावं लागत आहे. महिलेची इच्छा नसताना ती इतर पुरुषासोबत का राहते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण आहे ‘लुडो’. हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण खरचं या महिलेने लुडो खेळण्याच्या नादात स्वत:लाच डावावर लावलं आणि या डावात हरल्यामुळे आता तिला घरमालकासोबत रहावं लागतं आहे.

स्वत:लाच लावलं डावावर –

असं म्हणतात, जुगाराचे व्यसन लागलेल्या माणसाला चांगलं आणि वाईट यातील फरक कळतं नाही. त्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील एक महिलेला लुडो खेळण्याचं इतकं व्यसन लागलं की तिला आपण काय करतोय याचं भानच राहिलं नाही. या खेळात तिने स्वत:कडील सर्व पैसा,संपत्ती गमावल्यानंतर स्वतःलाच डावावर लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाभारतात पांडवांनी द्रौपदीला तिची इच्छा नसताना पणाला लावल्याची गोष्ट आपण अनेक वेळा ऐकली आहे. या महिलेने मात्र, स्वत:लाच पणाला लावलं आहे. त्यामुळे आता तिला नाईलाजास्तव घरमालकासोबत रहावं लागतं आहे.

हेही वाचा- प्रेयसीने नंबर ब्लॉक केला म्हणून तरुणाचा मोबाईल टॉवरवर चढून राडा; पोलिसांना म्हणाला, Video Call…

नवऱ्याने पाठवलेले पैसेही जुगारात उडवले –

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा नवरा मागील ६ महिन्यांपासून कामानिमित्त राजस्थानमधील जयपूर येथे गेला होता. तो तिथे काम करुन आपल्या पत्नीला घरखर्चासाठी पैसे पाठयचा. त्याची पत्नी प्रतापगड येथील देवकाली येथे एका भाड्याच्या घरात राहत होती. नवरा तिकडे काम करुन पैसे पाठवायचा पण ही बाई इकडे घरमालकासोबत लुडो खेळायची.

शिवाय खेळताना डावावर पैसे देखील लावायची, या खेळात सतत हरल्यामुळे तिने नवऱ्याने पाठवले सर्व पैसे संपवले. तरिदेखील तिची खेळण्याची हौस काही फिटली नाही. शेवटी या महिलेने मालकासोबत खेळताना स्वतःलाच डावावर लावलं आणि तिच्या दुर्देवाने ती शेवटचा डाव देखील हरली आणि घरमालक जिंकला. त्यामुळे खेळताना ठरल्याप्रमाणे या महिलेला घरमालकासोबत रहावं लागतं आहे. शिवाय या घटनेची माहिती महिलेने आपल्या नवऱ्याला फोन करून दिली, ‘मी लुडोमध्ये हरले आहे, आता तू आमच्या मध्ये पडू नको’ असं महिलेने नवऱ्याला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- मियां-बीबी राजी तो…, लांबचा मुहूर्त धरला म्हणून पठ्ठ्याने होणाऱ्या बायकोलाच पळवलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेचा पती रामपूरमधील बेल्हा येथील रहिवासी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे घटनेतील महिलेला दोन मुलं असताना तिने स्वत:ला डावावर लावण्याचं धाडस केलं आहे. दरम्यान, या महिलेच्या नवऱ्याने सांगितले की ‘मी माझ्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती घर मालकासोबतच राहत असून, घरमालकाकडे राहण्यास आपण मजबूर असल्याचं सांगत आहे.’ त्यामुळे आता हतबल नवरा बायकोला परत घरी आणण्यासाठी पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 15:02 IST
Next Story
बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा