कधी हिवाळा, कधी उष्णता तर कधी मुसळधार पाऊस – बदलणारं हवामान पाहून सामान्य माणूस बर्‍याचदा घाबरुन जातो. परंतु जेव्हा अशा दुर्गम भागात सीमेवर, जेथे हवामान शत्रूसारखे वागते, तेव्हा अडचण इतकी वाढते की आपण कल्पनाही करू शकत नाही.पण तरी भारताचे शूर सैनिक सीमेवर उभे राहतात. भारतीय लष्करातील जवानांचे कार्य देशवासियांसाठी अनमोल आहे. देशवासियांवर ज्या ज्या वेळी एखादं संकट ओढावतं तेव्हा भारतीय जवानच मदतीसाठी तत्पर असतात. मग ते सीमेचे रक्षण असो की देशातील काही समस्या लष्करातील जवान देशवासियांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. नुकताच जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियन आर्मीचं स्पिरिट नेहमीच प्रेरणादायी असतं. विकेंडची मज्जा लुटून आज पुन्हा कामाला लागणं तुम्हांला कठीण जात असेल तर एकदा हा व्हिडिओ बघाच. इंडियन आर्मीच्या ट्वीटर अकाऊंट वरून Monday Motivation म्हणत शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये आपल्या जखमी साथीदाराला घेऊन जाण्यासाठी एक चॉपर येतं आणि मदतीचा हाथ देतं असं दाखवण्यात आलं आहे. Leave no Soldier behind !!! या कॅप्शन सह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: भुकेलेल्या हरणानं थेट जिवंत साप खाल्ला, जबड्यात पकडताच नको ते घडलं अन्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओंमध्ये भारतीय लष्कराचे जवान अतिशय कठीण परिस्थितीत देशाचं रक्षण करताना दिसतात. लष्करामध्ये सैनिक असल्याने अतिउष्णता असो किंवा खोल बर्फाच्या आत उभे राहणे असो, अनेक कठीण आव्हानांना या सैनिकांना सामोरे जावे लागते. प्रत्येक ठिकाणी भारतीय सैनिक खंबीरपणे उभे राहतात आणि देशासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार असतात.