Women In Saree Falls Dancing Video: तुम्ही ती म्हण ऐकली आहे का, चहापेक्षा किटली गरम? आपल्याकडील बहुतांश लग्नांमध्ये विशेषतः हळदीला नाचायला गोळा झालेल्यांची गर्दी या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे. अनेकदा नवरा- नवरी त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक व मित्रांपेक्षाही काहीजण अतिउत्साहात नाचत असतात आणि मग काही वेळा हाच उत्साह चांगलाच अंगाशी येऊ शकतो. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे पण अनेकांना या डान्स करणाऱ्या महिलेची काळजी सुद्धा वाटत आहे. नेमकं असं या व्हिडिओमध्ये घडलं तरी काय हे पाहूया..

तुम्ही बघू शकता की, यामध्ये एक पुरुष व एक महिला वरातीत नाचताना दिसत आहे. दोघांच्या एकापेक्षा एक मूव्हज व रोमँटिक केमिस्ट्री वरातीतील अन्य वर्हाड्यांना सुद्धा आवडल्याचे दिसतेय. ते सुद्धा सगळे या दोघांना आपल्याच धुंदीत नाचताना पाहून आनंद घेत आहेत. पण अचानक या जोड्यातील पुरुषाला काय सुचतं आणि तो त्या महिलेला उचलून घ्यायला जातो. यानंतर साडी नेसलेली ही महिला तोल न सावरू शकल्याने थेट जमिनीवरच कोसळते, पुढे दोघांची जी काही फजिती होते ती पाहून तर तुम्हालाही हसावं की रडावं हे कळणार नाही. तुम्हीच हा व्हिडीओ प्रत्यक्ष पाहा

Video: लग्नात अतिउत्साह नडला, साडी नेसून बाई थेट…

View this post on Instagram

A post shared by Famous_marathi?? 20K (@famous_marathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक मीम पेजेस व इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट लिहीत, ” मित्रांनो लग्न कितीही जवळचं असुदे असे जास्त उत्साही होऊ नका” असे लिहिले आहे. काहींनी तर फक्त “काय गरज होती” असा प्रश्न या जोडप्याला विचारला आहे. काहींनी कमेंट करताना या दोघांच्या उत्साहाचे व त्याहूनही ऊर्जेचे कौतुक केले आहे. असं मनसोक्त नाचता यायला हवं व आपल्याबरोबर अशी मजा करणारा जोडीदार मिळायला हवा अशा पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स सुद्धा या व्हिडिओवर आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.