Viral Video: सोशल मीडियावर अनेकांचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी काला चष्मावर ठुमके देत नाचणारे परदेशी बॉलिवूड फॅन, तर कधी गोमी गोमी इंग्लिश गाण्यावर मेट्रो मध्ये नाचणारी चिमुकली मुलगी. कोणतीही भाषेची, वयाची बंधने न बाळगता हे व्हायरल कलाकार आपली कला दाखवत असतात. अनेकदा आपल्या व्हिडीओमध्ये ही मंडळी इतकी तल्लीन झालेली असतात की त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे याचं भानच राहात नाही.असाच काहीसा एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून सध्या नेटकरी हसावं की घाबरावं अशा बुचकळ्यात पडले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला अगदी धुंद होऊन नाचताना दिसत आहे. आजूबाजूचा परिसर पाहता हा लग्नाच्या समारंभातील व्हिडीओ असावा असा अंदाज येत आहे. पिवळी धम्मक साडी नेसून अगदी तल्लीन होऊन नाचणारी ही महिला खरंतर इतकी बिनधास्त आहे की त्यांचं कौतुक करायला हवं, पण तुम्ही कौतुक करायला जाणार इतक्यात असं काही घडतं की जे बघून अक्षरशः अंगावर शहारा येईल.

(Video: महिला मंडळाच्या मीटिंग मध्ये साडी नेसून केलेला ‘हा’ काला चष्मा डान्स घालतोय नेटकऱ्यांना भुरळ)

आपण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की ही महिला नाचताना तिच्या मागे अचानक एक चिमुकला येतो. अर्थात या बाई नाचण्यात इतक्यात गुंतलेल्या असतात की त्यांना अजिबात तो मुलगा दिसत नाही, नाचताना कदाचित त्यांचा पाय त्या मुलाच्या पायात अडकतो आणि त्या खाली कोसळतात. या लहान मुलाच्या अंगावर ही महिला पडताच पटकन आजूबाजूचे त्यांना बाजूला करतात पण त्या एका सेकंदात बघणाऱ्यांचा मात्र थरकाप उडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेभान डान्स व्हायरल

व्हिडिओच्या शेवटी मात्र सगळे हसताना दिसत आहेत त्यामुळे सुदैवाने या मुलाला काही दुखापत झाली नसावी. आपल्याही आजूबाजूला असे डॅशिंग डान्सर असतील तर बाबांनो, आपल्या लहान मुलांची नक्की काळजी घ्या.