भारतीय क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या शिखर धवनची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर धवनचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन बसून हार्मोनियम वाजवताना दिसत आहे; तर बॅकग्राउंडमध्ये ‘इंकी पिंकी पोंकी’ हे गाणे वाजत आहे. खुद्द शिखर धवनने त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून ही रील शेअर केली आहे; जी चाहत्यांना फार आवडली आहे. या व्हिडीओची कॅप्शनही खूप मजेदार आहे; जे पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही.

शिखर धवनचा इंकी पिंकीचा व्हिडीओ व्हायरल

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर हा कॉमेडी व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामुळे तो आता ट्रेंड वेबमध्ये सामील झाला आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये धवनने बहुचर्चित ‘इंकी पिंकी पोंकी’ ऑडिओ वापरला आहे. व्हिडीओमध्ये धवन बसून हार्मोनियम वाजवीत आहे आणि पार्श्वभूमीवर इंकी पिंकी पोंकी हे गाणे वाजत आहे. ही धून शाहरुख खान आणि काजोल यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘कुछ कुछ होता है’मधील ‘तुम पास आए’ गाण्यावर आधारित आहे. या रीलच्या कॅप्शनमध्ये शिखर धवनने विनोदीपणे लिहिले की, ‘ब्रेन नॉट ब्रेनिंग.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिखर धवनच्या एक्स्प्रेशनचे चाहत्यांनी केले कौतुक

हा व्हिडीओ आतापर्यंत १७.९ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. सोशल मीडिया युजर्सना त्याची ही स्टाईल खूप आवडली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना लोक धवनच्या फनी स्टाइलचे कौतुक करीत आहेत आणि त्याचे एक्स्प्रेशन्स बघून काही लोक त्याची तुलना बॉलीवूड स्टार्ससोबत करीत आहेत.