Viral Video: वडापावनंतर पाणीपुरी हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे, असे म्हणायला हरकत नाही. पाणीपुरीचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या जिभेवर त्याची चव रेंगाळू लागते. रगडा आणि खट्टामीठा पाण्याने भरलेल्या या पुऱ्यांचा स्वाद घेण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या पाणीपुरीबरोबर काही खास आठवणी तर नक्कीच असतील. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये पाणीपुरीची भुरळ अमेरिकेतील स्थानिक लोकांनासुद्धा पडलेली दिसून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत अमेरिकेचे काही नागरिक पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसले आहेत.
व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील मिनियापोलिसमधील आहे. अमेरिकेत करी कॉर्नर असे एक भारतीय रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या बाहेर एक पाणीपुरीचा स्टॉल लावण्यात आला आहे. पाणीपुरीचा स्टॉल पाहून अनेक रहिवासी येथे थांबून पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. प्रत्येक जण पाणीपुरी खाल्ल्यावर वेगवेगळे हावभाव करत आहेत, तर काही जण शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, असे व्हिडीओत दिसून येत आहे. पाणीपुरीचे सेवन केल्यानंतर अमेरिकेतील नागरिकांचे हावभाव कसे आहेत, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…VIDEO: बापरे! एका चाकावर सायकल उचलली अन्… ‘त्याचा’ हा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
व्हिडीओ नक्की बघा…
एका भारतीय व्यक्तीने ठरवले आणि लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड मिनियापोलिसच्या रस्त्यांवर नेले. तेथे रेस्टॉरंटच्या बाहेर एक पाणीपुरीचा स्टॉल लावला. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाने मोफत पाणीपुरी नागरिकांना देण्याचे ठरवले आहे; तसे त्याने तेथील टेबलवर एक पोस्टरदेखील लावले आहे. तसेच तेथील नागरिकांनी कुरकुरीत पुरी, झणझणीत पाणी पाहून त्याचा स्वाद घेण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच काही नागरिकांनी तर तीन-चार वेळा पाणीपुरी खाल्ली. तर काही लोक पुन्हा-पुन्हा त्या स्टॉलवर येऊन पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @currycornermn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आम्ही सर्वात लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड पाणीपुरीला मिनियापोलिसच्या रस्त्यांवर नेले’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ही रील काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली होती आणि आता या व्हिडीओला ३.९ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ९० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून भारतीय नागरिक त्यांचे पाणीपुरीचं प्रेम कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत.