Indian Railway Shocking Video : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी प्रवाशांबरोबर तिकिटाच्या पैशांवरून वाद तर कधी अरेरावीच्या भाषेत उत्तर देण्याचे त्यांचे प्रताप काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. अनेकदा प्रवाशांना गृहीत धरून ते रामभरोसे कारभार करताना दिसतात. सध्या अशाच एका रेल्वे कर्मचाऱ्याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो ड्युटीवर असताना प्रवाशांकडे दुर्लक्ष करून आपल्याच माजात आरामात फोनवर बोलताना दिसतोय. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय. कर्नाटकातील एका रेल्वेस्थानकातील तिकीट काउंटरवरील हा व्हिडीओ आहे.

प्रवासी तासभर रांगेत उभे अन्…

या व्हिडीओत एका तिकीट काउंटरबाहेर प्रवाशांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसत आहे. प्रवासी तासभर त्या रांगेत उभे आहेत, पण त्यावेळी ड्युटीवर असलेला तिकीट कर्मचारी मात्र रांगेकडे दुर्लक्ष करून आरामात खुर्चीवर बसून पाय पसरून मोबाईलवर कोणाशी तरी गप्पा मारतोय. अनेक प्रवासी त्याला जाब विचारतात, पण त्याने कोणालाही प्रतिसाद दिला नाही. या घटनेवरून प्रवासी प्रचंड भडकले, यावेळी प्रवाशांमधील कुणीतरी व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई केली आहे.

प्रवाशांची तिकिटासाठी मोठीच्या मोठी रांग

व्हिडीओत पाहू शकता की, तिकीट काउंटरवर बसलेला सी महेश नावाचा रेल्वे कर्मचारी पाय पसरून अगदी आरामात फोनवर बोलतोय, दुसरीकडे प्रवाशांची तिकिटासाठी मोठीच्या मोठी रांग उभी आहे, अनेक प्रवासी तासभर त्या रांगेत उभे आहेत. यात काही वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे. काही प्रवाशांनी तिकीट देण्याची विनंती केली, पण त्या कर्मचाऱ्याने सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एका वेळी एका प्रवाशाने थेट जाब विचारला, पण तो कर्मचारी सतत एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा असंच उत्तर देत राहिला; मात्र एक मिनिटाच्या नादात १५ मिनिटे गेले तरी कर्मचारी मात्र मोबाईलवर बोलतच होता.

काउंटरसमोर प्रवाशांची एवढी मोठी रांग उभी आहे, प्रवासी संतापलेत याची त्याला जराही लाज वाटत नव्हती, उलट रांग वाढत असतानाही तो फोनवर बोलण्यात मग्न होता. अखेर काही मिनिटांनी अनेक प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर त्याने फोन कट केला आणि तिकीट काउंटरवर तिकीटं देणं सुरू केलं. अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे.

तर अनेकांनी हे वर्तन खरंच लज्जास्पद आणि चीड आणणारं आहे असं म्हटलं आहे. अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीवर लगाम घालण्यासाठी काहीतरी कडक नियम, कायदे बनवले पाहिजेत अशी मागणी केली आहे.

दरम्यान, रेल्वेस्थानकांवर तुम्ही स्वत: अनेकदा अनुभवलं असले की, तिकिटासाठी प्रवाशांची मोठीच्या मोठी रांग असते. अनेक प्रवासी तासभर त्या रांगेत उभे असतात. या नादात अनेक ट्रेन सुटतात, प्रवाशांना ऑफिस, कॉलेज, कामाच्या ठिकाणी जाण्यास वेळ होत असतो. पण, तिकीट काउंटरवरील कर्मचारी मात्र हळूहळू तिकीट देण्याचं काम करत असतो. अनेकदा चहा पित, तर कधी बाजूच्या कर्मचाऱ्याशी गप्पा मारत आरामात त्याचं काम सुरू असतं, यावर एखाद्या प्रवाशाने आवाज उठवला तर त्याला मुद्दाम सुट्ट्या पैशांवरून थांबून ठेवलं जातं, तिकीट देण्यास टाळाटाळ केली जाते; तर अनेकदा कर्मचारी थेट जोरजोरात वाद घालू लागतात. यामुळे अनेक प्रवासी अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ काही नियम, निर्बंध आणावेत अशी मागणी करत आहेत.