Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओंच्या माध्यमातून प्रवाशांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय, त्यांचे वाईट अनुभव, अपघातांची दृश्ये आदींचे दर्शन घडविले जाते. जेणेकरून रेल्वे प्रशासन त्यावर लवकरात लवकर अॅक्शन घेऊ शकेल. पण, आता ट्रेनच्या डब्यातील असा एक फोटो समोर आला आहे की, जो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, भारतीय रेल्वे ट्रेनच्या डब्यात अळंबीची (मशरूम) शेती वगैरे होते की काय? कारण- फोटोमध्ये एका ट्रेनच्या डब्यामध्ये घाणीमुळे चक्क अळंबी उगवली आहेत. त्यातून आहे.
व्हायरल फोटोत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमधील एका लाकडी फळीवर मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झाली आहे आणि तिथेच काही अळंबीदेखील उगवल्याचे दिसत आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. फोटोवरून युजर्स ट्रेनमधील स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित करीत आहेत.
ट्रेनमधील एका लाकडी फळीवर उगवली अळंबी
ट्रेनमधील हा फोटो @B7801011010 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे फक्त भारतातच होऊ शकते. ट्रेनमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणारे शाकाहारी प्रवासी आता त्यांच्या दोन किंवा तीन दिवसांच्या प्रवासात अळंबीदेखील निवडू शकतात.
Read More Trending News : रस्त्यावर स्टंटबाजी करीत रील बनवणे तरुणाला भोवले, लोकांनी स्कुटी उचलली अन्…; पाहा धक्कादायक Video
व्हायरल फोटोत ट्रेनमधील एका गंजलेल्या वरच्या भागाजवळ जवळपास सहा अळंबी वाढताना दिसत आहेत. शेकडो युजर्स फोटो पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘दाल कॉकरोच’ ही मांसाहारी प्रवाशांसाठी डिश आहे; तर काहींनी लिहिले आहे की, भारत नवशिक्यांसाठी नाही. या फोटोमुळे रेल्वेतील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधीही रेल्वेच्या स्वच्छता व्यवस्थेवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, हा फोटो नेमका कधी आणि कोणत्या ट्रेनमधील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.