Emotional video: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. त्या कारवाईनंतर पाकिस्तानची चलबिचल आणखी वाढली असून पाकिस्तान आता भारताच्या दिशेने तथा सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करत आहे. मात्र, या ड्रोन हल्ल्य़ाला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्यदलासह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस!

सध्या भारत -पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्यदलासह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता एका गावचा सुपुत्र आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेचे एक अनोखे उदाहरण देशासमोर मांडले आहे.क्षणाचाही विलंब न करता भारतमातेच्या सुरक्षेसाठी तात्काळ निघाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी त्याच्या जवळच्या मित्राला मात्र अश्रू अनावर झाले. या दोन मित्रांमधलं प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल. रेल्वे स्टेशनवर मित्राला निरोप द्यायला आलेला मित्र भावूक झालेला पाहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मूमध्येही पहाटे ड्रोन हल्ले

जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळाला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानी सैन्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांच्या मते पहाटेपर्यंत शहरात अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. दरम्यान, राजौरी शहरावर जोरदार तोफांचा मारा करण्यात आला. ज्यामध्ये मुख्य शहराला लक्ष्य करण्यात आलं होतं. पहाटेच्या सुमारास पठाणकोट शहरात देखील अनेक स्फोटांचे आवाज आले. कमीत कमी अर्धा तास अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. तसेच भारतीय सैन्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.