सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराचे जवान कठोर परिस्थितीत देशाचे रक्षण करताना आपल्याला दिसतात. लष्करातील जवानांना अनेक कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागते हे आपणाला माहिती आहे. शिवाय बदलत्या हवामानाचा प्रचंड त्रासही त्यांना सहन करावा लागतो. कधी कडक उन्हात तर कधी शरीर गोठवणाऱ्या थंडीत उभं राहून त्यांना आपल्या कर्तव्याचं पालन करावं लागतं. सध्या अशाच एका भारतीय जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुमची छाती अभिमानाने भरुन आल्याशिवाय राहणार नाही.

हेही पाहा- दोन्ही पायांनी अपंग पण ‘या’ चिमुरड्याची क्रिकेट खेळायची जिद्द पाहिलीत का? Video होतोय व्हायरल

या व्हिडीओत एक जवान थंडीला, बर्फवृष्टीला न घाबरता चालताना दिसतं आहे. शिवाय या जवानाना चालताना किती कसरत करावी लागत आहे हे देखील व्हिडीओत दिसत आहे. मेजर जनरल राजू चौहान यांनी ट्विटरवर या सैनिकाचा रायफलसह बर्फात गस्त घालतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, या व्हिडीओतील तरी जवानाने दाखवलेले धाडस आणि त्याचे कष्ट मात्र थक्क करणारे आहेत.

हेही पाहा- Video: रील बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढण्याचा मोह नडला, क्षणात अंगातून धूर येऊ लागला अन्…

लष्करातील एक जवान गुडघाभर बर्फातून वाट काढत चालताना या व्हिडीओत दिसत आहे. गुडघाभर बर्फ असल्यामुळे या जवानाला पुढे जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. मात्र, हा जवान परिस्थिला न जुमानता हिंमतीने रायफल घेऊन पुढे सरकताना दिसतं आहे. थोड्याशा थंडीने आपलं अंग थरथर कापत असताना आपले जवान देशाच्या रक्षणासाठी अशा शरीर गोठवणाऱ्या थंडीचा सामना करताना पाहून त्यांच्याबद्दलचा आदर दुप्पट झाला आहे.

व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या रायफलने स्वतःचा तोल सांभाळत असल्याचं दिसतं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतका त्रास सहन करायला लागत असूनही या जवानाच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं आहे. म्हणूनच हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, ‘या तरुण सैनिकाच्या चेहऱ्यावरचे हास्य पहा.’ असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ २५ डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो १ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ८ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या आईची सेवा करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येते.’ तर दुसर्‍या व्यक्तीने लिहिलं आहे की, “इतके हाल सोसत भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम.”