Indigo staff dresses up Lord Ram, Sita and Lakshman for inaugural flight to Ayodhya :२२ जानेवारीला भारत नवा इतिहास रचणार आहे. या दिवशी अयोध्येतील भगवान श्रीरामाचा मंदिरात भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त केवळ अयोध्येतच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात तयारी सुरू आहे. त्यामुळे २२ जानेवारी ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे संपूर्ण देशातील राम भक्तांचा उत्साह शिगेला पोहचत आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण निर्माण होत आहे.
देशवासियांबरोबर अनेक बड्या कंपन्याही रामभक्तीत तल्लीन होण्यास सज्ज झाल्या आहेत. प्रभू रामाच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या व्यवसायाची थीमदेखील त्यावर आधारित करत आहेत. कंपन्यांची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आता अनेकांना भावली आहे.
सोशल मीडियावरही भक्तमय वातावरण पाहायला मिळतेय, ज्यात इंडिगो या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे. इंडिगोचे कर्मचारी यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इंडिगोचा एक कर्मचारी भगवान रामाच्या वेशभूषेत बोर्डिंगची घोषणा करत आहे. त्याच कर्मचार्याच्या मागे आणखी एक व्यक्ती हात जोडून उभा आहे, जो लक्ष्मणाच्या वेषात आहे, तर तिसरी एक महिला कर्मचारी माता सीतेच्या रूपात जवळ उभी आहे; तर आणखी एक कर्मचारी गुडघ्यावर बसला आहे आणि हात जोडून नमस्कार करत असल्याचे दिसतेय, ज्याने रामभक्त हनुमानाची वेशभूषा केली आहे.
दरम्यान, इंडिगो कर्मचार्यांनी अहमदाबाद आणि अयोध्यादरम्यान एअरलाइन्सच्या उद्घाटन फ्लाइटला फ्लॅग ऑफ करण्यासाठी हा गेटअप केला होता. यावेळी इंडिगोच्या कर्मचार्यांचा हा गेटअप पाहून तेथे उपस्थित प्रवासी खूपच प्रभावित झाले आणि त्यांच्यासाठी टाळ्याही वाजल्या. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी या थीमच्या आधारे धर्मनिरपेक्षतेचा संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे.
