गाणे, नृत्य, अभिनयापासून फॅशनपर्यंत कोणतेही कौशल्य दाखवण्यासाठी सोशल मीडिया हा एक चांगले प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे आजच्या काळात अनेक इन्फ्ल्युएन्सर्स आपल्या टॅलेंटच्या जोरावर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवीत आहेत. अशा काही प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर्सना भारतात सेलिब्रिटींपेक्षा कमी डिमांड नाही. जगभरात एक रील व्हायरल होत नाही, तोवर अल्पावधीत लाखो रील बनत असतात. त्यामुळे तरुणाईदेखील या कामाचा आनंद घेऊ लागली आहे. यातून केवळ नावच नाही, तर पैसा आणि प्रसिद्धी, असे सर्व काही मिळते. त्यात प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार सर्व काही करता येते.
बहुतेक लोक आपल्या यूट्युब चॅनेल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रॉडक्ट रिव्ह्यू, डान्स, सिंगिंग व अॅक्टिंगचे व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. नवशिके बहुतेक काम एकटेच करतात. पण, जेव्हा यातून चांगली कमाई होऊ लागते तेव्हा काही इन्फ्ल्युएन्सर एक ग्रुप करून व्हिडीओ तयार करू लागतात. पण, तुम्ही कधी अशी जागा पाहिली आहे का की, जिथे एकाच वेळी अनेक इन्फ्ल्युएन्सर येऊन व्हिडीओ बनवतात. नाही पाहिली ना; पण असा एक देश आहे की, जिथे चक्क इन्फ्ल्युएन्सर एका मोठ्या ऑफिससारख्या जागेत येऊन एकाच वेळी शेकडो व्हिडीओ बनवतात.
इन्फ्ल्युएन्सरची फॅक्टरी…
इंडोनेशिया असा एक देश आहे, जिथे खास इन्फ्ल्युएन्सर्सना व्हिडीओ बनवण्यासाठी एक फॅक्टरी आहे. याबाबत @PicturesFoIder नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबाबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, इंडोनेशियातील इन्फ्ल्युएन्सर्सची फॅक्टरी. या व्हिडीओमध्ये काही मुलं-मुली एका आलिशान ऑफिससारख्या जागेत संपूर्ण सेटअपसह व्हिडिओ शूट करीत असल्याचे तुम्ही पाहू शकता. काही ब्युटी प्रॉडक्ट्स, काही डान्सिंग, तर काही फॅशन ब्रँड्सचे व्हिडीओ बनवण्यात व्यग्र आहेत. प्रत्येक जण आपापल्या व्हिडीओच्या शूटमध्ये व्यग्र दिसतोय. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होच आहे. अनेकांना ही कन्सेप्ट खूप आवडली आहे.
काही युजर्स इन्फ्ल्युएन्सर फॅक्टरी पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. एकाने लिहिलेय की, ही संकल्पना भारतात आणली पाहिजे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, टिकटॉक नाही तरी इतका ड्रामा. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, शेवटी मला कळले की, व्हिडीओच्या मागची बॅकग्राउंड इतकी सुंदर कशी असते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा.