सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ असे असतात जे मोठमोठ्या उद्योगपतींनाही शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही. मग ते आनंद महिंद्रा असोत वा हर्ष गोयंका. सध्या हर्ष गोयंका यांनी असाच काही गावकऱ्यांच्या अनोख्या देशी खेळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो नेटकऱ्यांनादेखील खूप आवडल्याचं पाहायला मिळत आहे.

मोबाईल आणि इंटरनेट गावागावात पोहोचायच्या आधीचे लोक एका जागी जमा होऊन काही खेळ खेळायचे. पण आताच्या सोशल मीडियाच्या जमान्याने प्रत्येकजण दिवसभर हातात मोबाईल घेऊन बसतात आणि मोबाईलमध्येच गेम खेळतात. त्यामुळे मैदानी खेळ खेळणं बऱ्यापैकी बंद झालं आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर आजही काही गावांमध्ये लोक एकत्र जमा होऊन काही खेळ खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय तो खेळ एवढा अनोखी आणि भन्नाट आहे की, त्या खेळाचा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह उद्योगपती हर्ष गोयंका यांना देखील आवरता आला नाही.

गावकऱ्यांनी बनवला भन्नाट देशी खेळ –

हेही पाहा- नाईट क्लबमधील पार्टीसाठी माकडाच्या जीवाशी खेळ; साखळदंडाने बांधून नशा केली अन्…, संतापजनक Video व्हायरल

या भन्नाट खेळाचा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “गोल्फ, क्रिकेट, बॉलिंग काहीही समजा, पण हे खूप मजेदार वाटत आहे.” या व्हिडीओमध्ये गावातील लोक एका ठिकाणी जमून हा अनोखा खेळ खेळताना दिसत आहेत. जो याआधी कोणीही पाहिलेला नाही. या खेळात गोल्फ, क्रिकेट आणि बॉलिंग एकत्र केल्याचं दिसत आहे. व्हिडीओत, अनेक बाटल्या दोन समांतर रांगेत ठेवल्याच दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती बॅटने फुटबॉल मारते, जो सर्वात शेवटी ठेवलेल्या तांब्यांना धडकला तर तो जिंकणार, पण यासाठी त्यांनी अनोखी अट ठेवली आहे. आता ती अट नेमकी काय आहे आणि तो हर्ष गोयंका आणि नेटकऱ्यांना हा खेळ एवढा का आवडला आहे? ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर कळेल.

नेटकऱ्यांना आवडला खेळ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील खेळाची खास गोष्ट म्हणजे या खेळात जो कोणी जिंकेल त्याला गिफ्ट म्हणून घरगुती सामान दिलं जात आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला जिंकल्यानंतर तिला एक पुरुष तेलाचा डबा देत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर हजारो लोक तो लाईक करत आहेत. तर अनेकांनी यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “अशा छोट्या छोट्या खेळांनी गावातील लोक आपले आयुष्य खूप सुंदर बनवतात.”