Inspiring Viral Video: आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात, जे आपल्या आयुष्याचा प्रवासच बदलून टाकतात. त्या दिवसानंतर आपण पूर्वीसारखे राहत नाही. काही अनुभव असे असतात की, ते कायम जखम करून जातात, वेदना देतात आणि प्रत्येक क्षणी धीराची परीक्षा घेतात. पण, खरी ताकद जर मनामध्ये असेल, तर कोणतीही अडचण, कोणतीही अपंगता, कोणताही संघर्ष आपल्याला थांबवू शकत नाही.

आपण नेहमी आपल्या आयुष्याबद्दल तक्रार करतो – “नशीब साथ देत नाही, परिस्थिती प्रतिकूल आहे, नोकरी मिळत नाही, घरची जबाबदारी खूप आहे…” अशा हजारो कारणांनी आपण आयुष्याला दोष देतो. पण जर खरंच आयुष्याशी लढायचं असेल, तर कारणं नव्हे, धैर्य लागतं. हे धैर्य म्हणजे नेमकं काय असतं, ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एका अनोळखी माणसाचा व्हिडीओ जिवंत उदाहरणाच्या रूपाने आपल्यासमोर आलाय.

या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती तुम्हाला थक्क करून सोडेल. कारण- त्याला एक हात नाही… तरीही तो मजुरी करताना दिसतो. मोठमोठ्या बादल्या डोक्यावर घेऊन, तो ज्या जोशात काम करतो, ते पाहून तुमचं मन विचारेल – “हे शक्य कसं?” एका क्षणी तुम्हाला वाटेल की, हा माणूस त्याच्या कृती अन् कामांतून जणू संपूर्ण समाजालाच आरसा दाखवतोय. कारण- आपण छोट्या छोट्या त्रासाने, प्रसंगातूनही खचतो; पण तो? तो तर आपल्या अपंगत्वालाच ताकद बनवून जगाला प्रेरणा देतोय.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ त्या त्या प्रत्येक माणसाला उत्तर देतो, जे नेहमी आपल्या आयुष्याबद्दल तक्रारी करीत असतात. आज त्याचा हा व्हिडीओ पाहून लाखो लोकांची मती गुंग झालीय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाणार यात शंकाच नाही.

एक हात गमावला; पण गमावली नाही जगण्याची उमेद!

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक युवक दिसतो. त्याला एक हात गमवावा लागला आहे. पण, तरीही तो डोक्यावर मोठमोठ्या बादल्या उचलून मजुरी करताना दिसतो. फक्त एका हाताच्या आधारावर तो सिमेंटचे ओझे वाहतो, काम करतो आणि एवढे कष्ट अन् मेहनत करीत असतानाही चेहऱ्यावरील स्मित ढळू देत नाही. हे पाहून प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो– एवढी ताकद, एवढा आत्मविश्वास तो कुठून आणतो?

हा युवक फक्त स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरतोय. कारण- जेव्हा आपण लहान लहान गोष्टींनी खचतो, तेव्हा हा व्हिडीओ आरसा दाखवतो – खरी ताकद शरीरात नसते; तर मनात असते.

लोकांच्या प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @naughtyworld या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे, हजारोंनी त्याला लाइक केलेय. नेटकऱ्यांनी या युवकाच्या जिद्दीला दाद दिली आहे. एका युजरने लिहिले, “परिस्थिती कितीही प्रतिकूल असो; जर मेहनत करण्याची जिद्द असेल, तर कोणताही अडथळा रोखू शकत नाही.” दुसऱ्याने म्हटले– “शारीरिक कमतरता कधीही कमजोरी नसते; खरी शक्ती मनात आणि आत्म्यात दडलेली असते.”

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओकडे एकदा तरी नीट पाहा… खात्री बाळगा, तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल.