आरोग्य क्षेत्रात काही प्रकरण अशी घडतात की त्याची जगभरामध्ये चर्चा होते. असेच एक प्रकरण सध्या आयरिश मेडिकल जर्नलमध्ये छापून आल्यानंतर समोर आलंय. या विचित्र प्रकरणामध्ये पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर एका व्यक्तीला स्मृतीभ्रंश (अ‍ॅम्नेशिया) झाल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. मात्र हा स्मृतीभ्रंश तात्पुरत्या स्वरुपाचा होता.

आयरिश मेडिकल जर्नलने दिलेल्या माहितीनुसार ६६ वर्षीय व्यक्तीसोबत घडलेल्या प्रकाराला वैद्यकीय भाषेमध्ये स्ट्रान्सेट ग्लोबल अ‍ॅम्नेशिया (टीजीए) असं म्हणतात. पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दहा मिनिटांनंतर या व्यक्तीला स्मृतीभ्रंश झाल्यासारखं वाटू लागलं.

मायो क्लिनिकच्या माहितीनुसार टीजीएचा झटका येतो तेव्हा रुग्णाला काही काळापुरत्या गोष्टी आठवत नाहीत. मात्र हा परिणाम फार काळ टिकत नाही. काही वेळानंतर व्यक्तीला पुन्हा साऱ्या गोष्टी आठवू लागतात. या प्रकरणासंदर्भात लिमिरिक विद्यापीठ रुग्णालयातील न्यरोलॉजी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शरीरसंबंधांनंतर अचानक स्मृतीभ्रंश होण्याचा प्रकार घडू शकतो. संबंधित व्यक्तीने तातडीने रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि आपल्याला अ‍ॅम्नेशियाचा त्रास होत असल्याचं सांगितलं. तसेच डॉक्टरांना माहिती देताना सात वर्षांपूर्वीही आपल्याला अशाच पद्धतीने त्रास झालेला असं या रुग्णाने सांगितलं.

या सर्व प्रकरणासंदर्भात ‘रिकरंट पोस्कॉइटल ट्रान्सेंट अ‍ॅम्नेशिया असोसिएटेड विथ डीफ्युजन रिस्ट्रीक्शन’ या नावाने अहवाला सादर करण्यात आला असून या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं ज्यामुळे त्याची दोन दिवसांची स्मृती गेली याबद्दल सांगण्यात आलंय. “ज्या दिवशी रुग्णाला हा त्रास झाला आणि त्याने रुग्णालयामध्ये यासंदर्भातील तक्रार केली त्यापूर्वी १० मिनिटं आधी त्याने पत्नी शरीरसंबंध ठेवले होते. त्यानंतर त्याने स्वत:च्या फोनवर तारखी पाहल्यानंतर त्याला एका दिवसापूर्वी असलेला आपला लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही असं वाटू लागलं. मात्र त्याने आदल्या दिवशी लग्नाचा वाढदिवस त्याच्या पत्नीसोबत आणि कुटुंबियांसोबत साजरा केला होता. त्याची ऑटोबायोग्राफीकल मेमरीला (दिर्घकालीन) काहीही झालं नाही. मात्र त्याला त्या दिवशीची सकाळ आणि आदल्या दिवशीचं काहीच आठवत नव्हतं,” असं अहवालात म्हटलंय.

“ही व्यक्ती त्याच्या पत्नीला आणि मुलीला त्या दिवशी सकाळी आणि आदल्या दिवशी काय घडलं होतं याबद्दल प्रश्न विचारत होती. या व्यक्तीला इतर काही न्युरोलॉजिकल समस्या असल्याचं आढळून आलं नाही. आपत्कालीन केंद्रात त्याची तपासणी करण्यात आली पण त्यात काहीही आढळून आलं नाही,” असंही अहवालात नमूद करण्यात आल्याचं द न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात वर्षांपूर्वीही आपल्यासोबत असं घडल्याचं या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं. त्यावेळीही असाच घटनाक्रम घडला होता. त्यामुळेच आता ही व्यक्ती आपण पुन्हा तशाच परिस्थितीमधून जात असल्याचं वाटून आधीच्या दिवसांच्या घटना विसरला, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.