Airport Attacked British Officers Lying on Floor: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला एक फोटो तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. असा दावा करण्यात आला की हा फोटो अलीकडील आहे. तेल अवीवमधील बेन गुरियन विमातळावर इराकमधील इस्लामिक संघटनेने हल्ला केला असून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला यावेळी जमिनीवर स्वतःच्या बचावासाठी झोपले होते असेही काही पोस्ट्समध्ये लिहिलेले दिसतेय.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Lou Rage ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील हा फोटो शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही प्रथम कीवर्ड सर्चने आमचा तपास सुरू केला. आम्हाला एक रिपोर्ट आढळून आला ज्यामध्ये इराकी ड्रोन तेल अवीव विमानतळावर धडकल्याचा उल्लेख होता.
आम्हाला याबद्दलचे अनेक रिपोर्ट्स देखील आढळले.
रिपोर्ट्समध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, प्रतिकार गटाने ड्रोनने विमानतळाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे विमानतळावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आम्ही पोस्टसह वापरलेल्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. आम्हाला हा फोटो कोणत्याही बातम्यांच्या अहवालात वापरला गेल्याचे असल्याचे आढळले नाही.
आम्हाला arti49.com या वेबसाइटवर हा फोटो सापडला.
मूळ तुर्की भाषेतील अहवालात नमूद केले आहे: जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ रॉकेट अलार्ममुळे त्यांच्या संपूर्ण टीमसह जमिनीवर झोपून बचावाचा प्रयत्न करत आहेत. हा अहवाल १७ ऑक्टोबर २०२३ ला अपलोड करण्यात आला होता. तसेच १८ ऑक्टोबर २०२३ ला या घटनेचे काही व्हिडीओ सुद्धा X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आले होते.
आम्हाला टाइम्स ऑफ इस्रायलच्या वेबसाइटवर या घटनेबद्दलचा अहवाल देखील सापडला.
रिपोर्ट मध्ये म्हटले आहे: तेल अवीव जवळील बेन गुरियन विमानतळावर आज हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ इस्रायलला जाण्यासाठी विमानात बसले होते. संपूर्ण शिष्टमंडळाला विमानातून उतरून, डोके झाकून, प्रोटोकॉलनुसार डांबरावर झोपण्यास भाग पाडले गेले.
हे ही वाचा<< धक्कादायक! राजकीय पक्षाचं कौतुक केल्याने ट्रोल झालेल्या महिलेने ट्रेनसमोर मारली उडी; नेमकं प्रकरण काय?
निष्कर्ष: बेन गुरियन विमानतळावर हल्ला झाल्याच्या दाव्यासह शेअर केलेला फोटो खरा असला तरी अलीकडील नाही.