Simpsons Predicttion about Indian Pak : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, भारत सरकारने कठोर पावले उचलली. पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आणि भारतातील काही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आणि त्यांना पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. दरम्यान लोकप्रिय अॅनिमेटेड शो ‘द सिम्पसन्स’ मधील एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारताच्या प्रत्युत्तराबाबत भाकित करण्यात आले आहे. यात ‘द सिम्पसन्स’ शो मधील एक दृश्यातध्ये भारत पाकिस्तानवर अणुहल्ला करत असल्याचे दाखवले आहे.
X (पूर्वीचे ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात शेअर केलेली ही क्लिप, बार्ट टू द फ्युचर, सीझन ११, एपिसोड १३ मधील आहे, जी १९ मार्च २००० रोजी प्रसारित झाली. द सिम्पसन्सने दाखवलेला हा भाग सध्या घडलेल्या घटनेच्या २५ वर्षांपूर्वी उल्लेखनीयपणे प्रसारित केला होती, ज्यामध्ये असेच काहीसे घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
द सिम्पसन्समधील एका दृश्यात क्रस्टी द क्लाउन भारत आणि पाकिस्तानबद्दल वादग्रस्त विनोद करताना दिसत आहे, ज्यामध्ये भारत पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करत असल्याचा उल्लेख आहे. तो म्हणतो की, “पाकिस्तान आणि पॅनकेकमध्ये काय फरक आहे? “भारताने अणुहल्ला केलेला कोणताही पॅनकेक्स मला माहित नाही!”. तो नंतर म्हणतो, “काय? खूप लवकर?”
एका एक्स वापरकर्त्याने ही क्लिप शेअर करत म्हटले आहे की, “तुमच्या माहितीसाठी, सिम्पसनने भारताकडून पाकिस्तानवर अणुहल्ला होण्याची भविष्यवाणी केली आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “सिम्पसन त्याच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जाते.”पण, या क्लिपची सत्यता अनिश्चित आहे, काहीजण प्रश्न विचारत आहेत की ती मूळ आहे, एडीटेड आहे किंवा विशेषतः ऑडिओमुळे. अगदी AI तंत्रज्ञान वापरून तयार केलेली असे वाटते आहे.
पहलगाम हल्ल्याची अपडेट
अलीकडील अहवालांमध्ये, पाकिस्तानने पुढील २४-३६ तासांत हल्ल्याबद्दल विश्वासार्ह गुप्तचर माहिती मिळाल्याचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानवरील आरोप फेटाळून लावले आणि ते “निराधार” म्हटले. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून आणि दोन्ही देशांना तणाव कमी करण्यास सांगितले.