scorecardresearch

जग्वारने नदीत उडी मारत केली मगरीची शिकार, शिकारीचा video viral

हा व्हिडीओ आतापर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी पहिला आहे.

Jaguar Hunt Crocodile
व्हायरल व्हिडीओ (फोटो: EXODOR / Youtube)

वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक जग्वार पाण्यात उडी मारून मगरीची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही बघतच राहाल. या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.

जग्वारने पाण्यात केली शिकार

तसे पाहता, मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. दुसर्‍या अर्थाने त्याला पाण्याचा किंग असेही म्हणता येईल. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मगर पाण्यासोबत जमिनीवरही अनेकदा शिकार करते, मात्र या व्हिडीओमध्ये जग्वार पाण्यात घुसून मगरीची शिकार करते. जग्वार उंचावरून मगरीवर ज्या प्रकारे हल्ला करतो, ते पाहणे खूपच रोमांचक आहे.

(हे ही वाचा: वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! राजपाल यादवचा जिमचा करतानाचा मजेशीर Video Viral)

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर नदीत पोहत आहे. त्याच वेळी, जग्वार मोठ्या उंचीवर बसून आपल्या शिकारीची वाट पाहत आहे. मग अचानक मगर जग्वारला दिसते. यानंतर, जग्वार अनेक फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी मारतो. जग्वार मगरीवर सरळ उडी मारतो आणि त्याच्या दातांनी त्याला पकडतो. मगरीला सावरण्याची अजिबात संधी मिळत नाही.

(हे ही वाचा: डोक्यावर सामान ठेवून बॅलेंन्स करत सायकल चालवणाऱ्या तरुणाचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक; म्हणाले…)

(हे ही वाचा: Viral Video: एकापाठोपाठ एक अनेक हरणांनी मिळून केला बारवर हल्ला; कारण…)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

मगरीला त्याच्या मजबूत दातांनी पकडून जग्वार जंगलाच्या दिशेने घेऊन जातो हे तुम्ही पाहू शकता. EXODOR नावाच्या युट्युब चॅनलवर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी पहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jaguar jumps into river hunts crocodiles hunter video goes viral ttg

ताज्या बातम्या