Viral video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. जयपूरमध्ये रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार आणि तितक्यात पाठीमागून मालगाडी आणि त्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.

दारूच्या नशेत रिल्स बनवण्याच्या नादामध्ये महिंद्रा थार गाडी रेल्वेच्या रूळांमध्ये अडकल्याची घटना घडली आहे.दारूच्या नशेत एसयूव्ही कार रेल्वे रुळावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने रील बनवण्यासाठी आपली महिंद्रा थार रेल्वे रुळावर नेली. मात्र, थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागून मालगाडी आली. सुदैवाने, लोको पायलटने वेळीच ब्रेक लगावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही थरारक घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी घडली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रील काढत असताना मद्यधुंद थार चालकाने रेल्वे रुळावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन रेल्वे रुळाच्या मध्यभागी अडकले. मद्यधुंद अवस्थेत असल्याने गाडीवरील पूर्ण नियंत्रण सुटलं होतं. यावेळी मालगाडीच्या लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत मालगाडी वेळेत थांबवली. त्यानंतर लोकांच्या मदतीने सुमारे १५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर थार रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यात आली. रेल्वे रुळावरून थार बाहेर आल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे .