नवरात्रीच्या नऊ दिवसांचा आनंद भारतीयांनी तर लुटलाच; पण परदेशातसुद्धा नवरात्रीची क्रेझ पाहायला मिळाली. एक जपानी इन्फ्लुएन्सर तिच्या भारतप्रेमामुळे सोशल मीडियावर लोकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. या जपानी तरुणीने नवरात्र एका खास पद्धतीने साजरी केली. तिने नवरात्रीच्या नऊ दिवसांचे चॅलेंज स्वीकारले आणि प्रत्येक दिवशी नऊ रंगांचे पोशाख घालून उत्तम सादरीकरण केले.
जपानी तरुणीचे नाव मायो (Mayo) असे आहे. मायो या तरुणीने नवरात्रीचे नऊ दिवसांचे अनोखे चॅलेंज स्वीकारले होते. त्यात तिने पहिल्या दिवशी नवरात्रीच्या शुभेच्छा देत, चणिया चोळी घालून गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ‘झुमे रे गोरी’ या गाण्यावर गरबा सादर केला. दुसऱ्या दिवशी याच चित्रपटातील ‘ढोलीडा’ गाण्यावर साडी नेसून तिने डान्स सादर केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रामलीला या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘नागाडा सांग ढोल’ यावर कुर्ता घालून अगदीच हटके डान्स केला. त्यानंतर चौथ्या दिवशी सत्यप्रेम की कथा या चित्रपटातील ‘सून सजनी’ गाण्यावर पुन्हा साडी नेसून गरबा केला. त्यानंतर पाचव्या दिवशी खलासी या ट्रेंडिंग गाण्यावर लेहंगा घालून तिने व्हिडीओ बनवला. सहाव्या दिवशी दांडिया घेऊन गरब्याच्या अनोख्या स्टेप केल्या. सातव्या दिवशी तिने थोडा ब्रेक घेतला आणि आठव्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसून ‘डाकला’ गाण्यावर मैत्रिणीसोबत व्हिडीओ पोस्ट केला.
हेही वाचा… दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा HD Images मधून Whatsapp Status, फेसबुकवर शेअर करून साजरी करा विजयादशमी
व्हिडीओ नक्की बघा :
नवरात्रीचे नऊ दिवसांचे चॅलेंज केले पूर्ण :
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मोरपिसी रंगाचा घागरा घालून ‘दिल से चुके सनम’ चित्रपटातील ‘ढोली तारो ढोल बाजे’ गाण्यावर अनोखा गरबा करीत हे चॅलेंज पूर्ण केले आणि लिहिले की, नवरात्री चॅलेंज दिवस ९ : मोरपिसी… तर मी जवळपास नऊ रंगांचे, नऊ दिवसांचे नवरात्री चॅलेंज पूर्ण केले. फक्त राखाडी रंगाचा पोशाख नाही घालता आला. कारण- माझ्याकडे राखाडी रंगाचा पोशाख नव्हता किंवा दुसर्याकडून घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. पण, मला जपानमधील नवरात्री कार्यक्रमाचे काही फुटेज मिळाले आहेत; तर ते मी अकाउंटवर लवकरच पोस्ट करेन. मला ‘दिल से चुके सनम’ चित्रपट आवडला. मी तो पुन्हा कधीतरी नक्की बघेन, अशी सुंदर कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.
जपानी तरुणी मायोने हे सर्व व्हिडीओ तिच्या @mayojapan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, नवरात्रीचे नऊ दिवसांचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तिने नऊ दिवस पारंपरिक पोशाख परिधान केले आणि बॉलीवूडच्या सर्व प्रसिद्ध गरब्याच्या गाण्यावर तिने व्हिडीओ पोस्ट केले आहेत.