सासू-सुनेचं हे नाते अतिशय नाजूक आणि अतिसंवेदनशील मानलं जाते. यात थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. सासू-सूनेच्या वादाची अनेक उदाहरण तुम्ही ऐकली असतील. पण सासू आणि सूनेनं मिळून एखादा व्यावसाय केलेला तुम्ही कधी ऐकलाय का? झारखंडमधील सासू सुनेनं करोनाच्या काळात एक अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे अनेकांना रोजगार उपलबद्ध झाला आहे. आर्थिक मंदीच्या काळात सासू-सुनेनं आनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. झारखंडमधील धनबबाद येथील ७० वर्षीय मनोरमा सिंह आणि ३२ वर्षीय स्वाती कुमारी यांनी मिळून लॉकडाउनच्या काळात अॅप तयार केलं आहे. या अॅपचं नाव ‘गुरु-चेला’ असं ठेवलं आहे. प्ले स्टोरवर हे अॅप मोफत आहे.
सासू-सुनेनं मिळून लॉकडाउनमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी हे अॅप विकसीत केलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थांसाठी हे अॅप फायद्याचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या अॅपवर रजिस्टर करु शकतात. त्यानंतर आवशकतानुसार शिक्षक ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस घेण्यासाठी उपस्थित राहू शखतात. या अॅपमुळे इंजिनिअरिंग, यूपीएससी, गीत, संगीत, योग आणि चित्रकलासारख्या शिक्षकांना फायदा होत आहे. या अॅपमुळे आतापर्यंत ४० पेक्षा जास्त जणांना रोजगार मिळाला आहे. शिक्षित बेरोजगार या अॅपच्या मदतीमुळे पैसे कमावत आहे. १०० पेक्षा जास्त विद्यार्थांना या अॅपमुळे मार्गदर्शन मिळत आहे. सुशिक्षित बेरोजगार या अॅपमुळे दहा ते २० हजार रुपये कमावत आहेत.
या अॅपला आयआयटी, आयएसएम, बीआयटी सिंदरी, बीएड करणारे विद्यार्थांनीही हे अॅप डाउनलोड केलं आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सीआयएमएफआरचे निवृत्त विज्ञानी डॉ. केके शर्मा जोडले आहे. ते घऱबसल्या विद्यार्थांना मार्गदर्शन करतात. वर्षाखेरीपर्यंत २५० पेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार देण्याचं या सासू-सुनेचं लक्ष आहे. या अॅपसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दहावी पास सासू मनोरमा आणि बीएड झालेली सून स्वाती यांनी अवघ्या दोन महिन्यात या अॅपची निर्मिती केली आहे. दिल्लीमध्ये शिकणारी नात वस्तल सिंह हिला आई आणि आजीचा हा प्रयोग खूप आवडला.
