Customer And Shopkeeper Viral Video : एखादी वस्तू विकण्यासाठी व्यापारी नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. मग ती ऑफर असो, डिस्काउंट असो किंवा मग दुकान सुंदररीत्या सजवणे असो. आता रिल्स जास्त प्रमाणात पहिले जातात. त्यामुळे काही व्यापारी त्यांचा व्यवसाय व्हिडीओद्वारे सुद्धा दाखवतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये व्यापाऱ्याने ग्राहकांना बोलावण्यासाठी अनोखा जुगाड शोधून काढला आहे; जो तुम्हाला पोट धरून हसायला नक्कीच भाग पाडेल.
व्हायरल व्हिडीओ एका परफ्यूम विक्रेत्याचा आहे. एक अज्ञात व्यक्ती परफ्यूम विक्रेत्याच्या दुकानाच्या बाजूने जात असतो. तर या अज्ञात व्यक्तीने आपल्या स्टॉलवर यावे आणि परफ्यूम विकत घ्यावा यासाठी त्याने जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे. तो अज्ञात व्यक्तीला एवढ्या जोरात हाक मारतो की, त्याच्या सामानाचे काहीतरी त्याने नुकसानच केले आणि व्यापारी आता त्याला थेट मारणारच आहे. अज्ञात व्यक्ती स्टॉलजवळ येतो आणि मग काय झालं असं आश्चर्याने त्याला विचारते.
परफ्यूम विकण्याची स्टाईल थोडी कॅज्युअल आहे (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, व्यापारी अज्ञात व्यक्तीला जोरात आवाज देतो. तेव्हा आजूबाजूचे सुद्धा घाबरतात. पण, आवाज दिल्यावर अज्ञात व्यक्ती स्टॉलजवळ येतो आणि ‘मग काय झालं’ असं आश्चर्याने त्याला विचारते. त्यानंतर “मी तुला सांगू का” तर अज्ञात व्यक्ती “हो” म्हणते. नंतर मग व्यापारी परफ्यूमची किंमत सांगायला लागतो. मग अज्ञात व्यक्तीच्या जीवात जीव येतो आणि आपण परफ्यूम खरेदी करावा यासाठी व्यापाऱ्याने हा जुगाड केला आहे हे त्याला समजते आणि तो हसायला लागतो. नंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shams.qadri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘फक्त शेवट बघा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि “परफ्यूम विकण्याची स्टाईल थोडी कॅज्युअल आहे”, “हा जुगाड जबरदस्त आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला असला तरीही नेटकरी व्यापाऱ्याच्या जुगाडाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.