Juice Seller Viral Video: उन्हाळ्यात थंडगार ऊसाचा रस पिण्याचे सुख आणि आनंद काही वेगळाच असतो. आपल्यापैकी बहुतेक जण उन्हाळ्यात ऊसाचा रस अगदी आवडीने पितात. दुकानदार २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत विकल्या जाणाऱ्या या रसात लिंबू, पुदिना आणि काळे मीठ घालतात, जेणेकरून गोडवा मर्यादित राहतो आणि चव तशीच राहते. पण, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये लिंबाबद्दल गोंधळ उडाला आहे. खरंतर हा गोंधळ ऊसाच्या रसात वापरल्या जाणाऱ्या लिंबाबद्दल उडाला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमक घडलं काय ते जाणून घेऊया.

नेमक घडलं काय?

एक तरुण ऊसाचा रस विकतोय. ऊसाचा रस विकणारा तरुण लिंबू वापरत होता. ती लिंब सामान्य लिंब नव्हती, तर काली मातेच्या मंदिरातून आणली होती. पैसे वाचवण्यासाठी हा ऊसाचा रस विकणारा तरुण देवीच्या मंदिरात हार म्हणून घातलेले लिंबू रसामध्ये वापरत असायचा. काली मातेला लिंबाचा हार अर्पण केला जातो, कारण ती नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करते. आता हा ऊसाचा रस विकणारा तरुण पैसे वाचवण्यासाठी मंदिरात हार म्हणून घातलेले लिंबू रसामध्ये वापरत असायचा.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसते की, एक व्यक्ती सांगते, ऊसाचा रस विकणारा तरुण देवीला अर्पण केलेले लिंबू रसामध्ये वापरत आहे. ती व्यक्ती पुढे माळा दाखवते आणि म्हणते की, ‘हे माता कालीच्या मंदिरात अर्पण केले होते.’ हे ऐकताच, एक व्यक्ती दुकानात काम करणाऱ्या मुलांना लगेच मारहाण करायला सुरुवात करते. पण, व्हिडीओ बनविणारा व्यक्ती त्याला असे करण्यापासून थांबवतो आणि म्हणतो की आपण त्यांचा व्हिडीओ बनवूया. आता या संपूर्ण घटनेच्या व्हायरल व्हिडीओला इंटरनेटवर बराच प्रतिसाद मिळाला आहे.

ही घटना दिल्ली येथील शनी बाजार रोड सुलतानपुरी येथील असल्याचे ती व्यक्ती सांगते. ऊसाच्या रसाचे दुकान चालवणारा तरुण काली मातेला अर्पण केलेले लिंबू आणतो, जे तो रसात मिसळून लोकांना विकतो. पण, ती व्यक्ती त्याला रंगेहाथ पकडते. सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये बराच वाद आहे.

इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करताना @neeraj.mak ने लिहिले, “ऊसाच्या रसात कोणते लिंबू वापरले जात आहे ते पाहा.” आतापर्यंत या व्हिडीओला ६७ हजार व्ह्युज मिळाले आहेत, तर पोस्टला दोन हजारांहून अधिक लाईक्स आणि अडीचशेहून अधिक कमेंट्सदेखील मिळाल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

कमेंट सेक्शनमध्ये युजर्स ऊसाचा रस विक्रेत्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. एका युजर्सने लिहिले, “काहीही चूक नाही, मोठ्या मंदिरांमध्ये अर्पण केलेले नारळदेखील दुकानात परत विकले जातात.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “हा आईचा आशीर्वाद आहे, भाऊ यात काय चूक आहे?, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत…आता तुम्हीच सांगा चूक कुणाची…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.