Lion Enters Camping Tent: निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक करण्याची मजा काही औरच असते. जंगलात एखाद्या रम्य ठिकाणी निवांत तंबू (कँप) लावून निसर्गाचा आनंद घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तसंच काहीसं एक ग्रुप करत होता. चहूबाजूला हिरवळ, संध्याकाळची शांती, मध्यम उजेडात सुरू असलेलं निवांत कँपिंग… सगळं काही अगदी स्वप्नवत वाटत होतं. पण, अचानक घडलं असं काही की तिथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया…

हा थरारक प्रसंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. worldinone763 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, दोन सिंह (Lion) अगदी शांतपणे त्या तंबूकडे सरकत येतायेत. सुरुवातीला तिथे उपस्थित जोडप्यांना काहीच संशय येत नाही. मात्र, जसजसा सिंह जवळ येतो, तसतसं वातावरण बदलू लागतं.

सिंह तंबूमध्ये घुसतो, थरार शिगेला!

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं, दोन सिंह हळूहळू तंबूजवळ फिरू लागतात. त्याचं वर्तन पाहून वाटतं की ते काहीतरी शोधत आहेत. काही क्षणांतच त्यांची नजर तंबूच्या एका उघड्या भागावर पडते. मग काय! सिंह सरळ त्या दिशेने वळतो आणि तंबूच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागतो. आत बसलेले लोक एकदम घाबरून जातात. ते दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत सिंह आत घुसतो. त्या क्षणाचं थरारनाट्य इतकं भयावह आहे की स्क्रीनवर पाहूनही काळजात धस्स होतं. क्षणभर सगळ्यांनाच वाटतं की आता काहीतरी वाईट घडणार, कोणी तरी जखमी होणार, पण…

आणि मग… जे घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं!

सिंह आत आल्यानंतर वातावरणात एक भीतीचं सावट पसरतं. सगळे थरथरत त्याच्या हालचाली पाहत राहतात. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंह आत आल्यानंतर कुणालाही इजा करत नाही. काही क्षण तो निवांत फिरतो आणि नंतर तसाच शांतपणे बाहेर निघून जातो. हा प्रसंग जरी सुखरूप संपला असला तरी याने एक गोष्ट स्पष्ट होते, जंगलातील अशा साहसी मोहिमा अत्यंत जोखमीच्या असतात. जंगलाचा नियमच वेगळा असतो आणि तिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटमध्ये आपली भीती, शॉक आणि थरार व्यक्त केला आहे. “हे खरंच झालंय का?”, “सिंह एवढा जवळ आणि कोणी जखमी नाही?”, अशा प्रकारचे अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.