सोशल मीडियावर कोणती रिल केव्हा व्हायरल होईल सांगता येत नाही. अगदी कच्चा बदामपासून ते माणिक मांगे हितेपर्यंत रिल्समध्ये अनेक ट्रेंड आले आणि ट्रेंड निर्माण करणाऱ्यांना रातोरात खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या असाच एका महिलेचा नवा डायलॉग खूप ट्रेंड होत आहे. इतकचं नाही तर अनेकांच्या तोंडूनही हा डायलॉग ऐकायला मिळतोय. ज्यावरुन इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स क्रिएट केल्या जात आहेत. ज्यामुळे इन्स्टावर स्क्रोल करताच तो सेम डायलॉग वापरुन केलेल्या रिल्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. हा डायलॉग म्हणजे ‘सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाओ…..’ अगदी सामन्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी त्यावर रिल्स बनवल्या आहेत. तिचा हा डायलॉग अनेकांना खूप आवडला आहे.

आतापर्यंत दीपिकी पदुकोण, रणवीर सिंग, निक जोनास आणि इतर अनेक सेलिब्रिटी हा ट्रेडिंग डायलॉग बोलताना दिसले आहेत. पण यावरून सोशल मीडियावर लोकांना जाणून घ्यायचे आहे की, ‘सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव…..’ हा ओरिजनल डायलॉग म्हणणारी महिला नेमकी कोण आहे?

या महिलेच्या डायलॉगने आता सर्वांनाच भुरळ घातली आहे. तर अनेकजण तिला रोस्ट करत आहेत. हा ओरिजनल डायलॉग बोलणाऱ्या महिलेचे नाव आहे जास्मिन कौर. ती ‘डिझाईन मशीन’ नावाचे एक बुटीक चालवते, दिल्लीतील  टिळक नगरमध्ये तिचे बुटीक आहे. गेल्या 18 वर्षांपासून बुटीक चालवणाऱ्या जस्मिनचे इन्स्टाग्राम पेज आहे ज्यावर तिचे 601k फॉलोअर्स आहेत. ती तिच्या बुटीकमध्ये महिलांचे अनोखे डिझाइन आणि रंगांचे आउटफिट सेल करते. विशेष बाब म्हणजे जस्मिन प्रत्येक आउटफिटला कलर आणि डिझाइन पाहून युनिक नावाने डिफाइन करते. जसे की लाड्डू पिला कलर, माउस कलर, राम ग्रीन रंग, चेरी मेहबूब कलर, वैगरे, वैगरे…

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगपासून ते करण जोहर , सान्या मल्होत्रा ​​आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँपर्यंत, प्रत्येकजण तिचा वन-लाइनर डायलॉग वापरुन व्हिडीओ बनवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका डायलॉगमुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे जस्मिन कौर आता खूप आनंदी आहे. इतकेच नाही तर यानंतर तिला एका मॅगीच्या जाहिरातीचीही ऑफर मिळाली.