अनेकदा इंटरनेटवर असे फोटो व्हायरल होत असतात ज्यांचा वेगळा प्रचार करावा लागत नाही. काही क्षणांत असे फोटो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पॉप सिंग केटी पेरी यांचं चुंबन या फोटो कैद झालं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय दिसतं आहे फोटोंमध्ये?

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये केटी आणि जस्टिन हे एका यॉर्टवर आहेत. यॉर्टवर ते चुंबन घेताना आणि एकमेकांच्या बाहुपाशात दिसत आहेत. या दोघांची मैत्री आहे अशा चर्चा रंगल्या होत्या, पण या दोघांचे प्रेमसंबंध आहेत हे दाखवणारेच हे फोटो आहेत. जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असताना त्यांनी भारतविरोधी वक्तव्यं केली होती. ज्यांची चांगलीच चर्चा झाली होती. आता व्यक्तिगत आयुष्यामुळे ट्रुडो आणि केटी पेरी दोघंही चर्चेत आले आहेत.

जस्टिन ट्रुडो आणि केटी यांचा क्वालिटी टाइम

जस्टिन ट्रुडो आणि केटी पेरी यांचे हे यॉर्टवरचे फोटो व्हायरल झाले असून या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. दोघंही त्यांचा क्वालिटी पर्सनल टाइम एंजॉय करताना दिसत आहेत. जुलै २०२५ मध्ये जस्टिन ट्रुडो केटीच्या कॉन्सर्टला गेले होते. त्यावेळी या दोघांचा डिनरचा फोटो समोर आला होता. त्यानंतर हा फोटो आता समोर आला आहे.

अफेअरच्या चर्चा कधी सुरु झाल्या?

२८ जुलैला जस्टिन ट्रुडो आणि केटी पेरी हे एका कॉन्सर्टमध्ये दिसले होते. त्यावेळी ते डिनर करताना स्पॉट झाले होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या दोघांचा किसिंग करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

ट्रुडोंपेक्षा केटी आहे जास्त श्रीमंत

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि केटी पेरी या दोघांचीही पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कॅनडाच्या राजकीय वर्तुळातला चेहरा म्हणजे ट्रुडो आहेत तर केटी पेरी हॉलिवूडची बिग स्टार आहे. पॉप विश्वात तिने तिची वेगळी ओळख तयार केली आहे. केटी आणि जस्टिन यांची नेटवर्थ पाहिली तर केटी ट्रुडोंपेक्षा जास्त श्रीमंत आहे. जस्टिन ट्रुडो यांची २०२५ पर्यंतची नेटवर्थ ९५ मिलियन डॉलर्स इतक आहे तर केटीची २०२५ पर्यंतची नेटवर्थ ही ४०० मिलियन डॉलर्स इतकी आहे. ट्रुडो यांचा चाहता वर्ग राजकारण्यांपुरता मर्यादित आहे पण केटीचे फॅन्स जगभरात आहेत. त्यामुळे या दोघांचे हे व्हायरल हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.