Kalachowkicha Mahaganpati Video: गणपती बाप्पा मोरया…, मंगलमूर्ती मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काहीच दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत. खरं तर गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून २२ दिवस बाकी आहेत. पण, मुंबईत काही ठिकाणी आताच गणेशमूर्तींचे आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीच्या आगमन मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या काळाचौकीच्या महागणपतीचा काल आगमन सोहळा रंगला होता.उत्सवाचं औचित्य, श्रद्धेचा आविष्कार आणि आनंदाचं ते रूप म्हणजे काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन… हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्तांनी एकत्र येत बाप्पाचं भव्य स्वागत केलं.पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात, बँड पथकाच्या सुरांमध्ये आणि गोविंदा पथकाच्या सलामीत महागणपतीचं आगमन मोठ्या जल्लोषात पार पडलं. मात्र ज्याठिकाणी हा बाप्पा विराजमान होतो तिथे जाण्यासाठी बाप्पाालाही मोठी कसरत करावी लागते. कारण अतिशय कमी जागेतूनही मुर्ती तिथपर्यंत पोहचवण्याचं भक्तांपुढंही आव्हान असतं. अशातच याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन्ही बाजूंनी घर आणि मधल्या चिमुकल्या गल्लीतून एक भलीमोठी मुर्ती वाजत गाजत नेली जात आहे. गणपती बाप्पाचा हा थरारक व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मुर्ती आणली जातेय तो मार्ग अत्यंत निमुळता आहे. दोन्ही बाजूंना घरं आहेत. पण लक्षवेधी बाब म्हणजे मुर्तीकारानं या रस्त्याचा विचार करूनच अगदी योग्य मोजमापाची मुर्ती तयार केलीये. त्यामुळे हे गणपती बाप्पा अगदी सहजरित्या या चिमुकल्या गल्लीतूनही मंडपात जात आहेत. शिवाय भोवताली भक्तगण अगदी नाचत, जल्लोष करत बाप्पाचं स्वागत करतायेत. मात्र यावेळी जी गर्दी दिसतेय ती मोठ्या प्रमाणात आहे, यावेळी कार्यकर्तेही गर्दीला पुढे जाण्यासाठी सांगत आहे अशावेळी एक छोटीशी चूक महागात पडू शकते. कारण एवढ्याशा गल्लीतून एवढी मोठी मुर्ती घेऊन जाणं मोठं आव्हानच आहे. अशावेळी लोकांनी मुर्तीचा आकार कमी करावा अशी मागणी केलीय.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ lalbaugmumbaikar_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.