करोना महामारी विरोधात जग एक होऊन लढत आहे. जगभरातील सर्व वैज्ञानिक आणि संशोधक या विषाणूवर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत. काही प्रमाणात यामध्ये यश आले मात्र अधिकृतरित्या अद्याप कोणतीही लस मिळालेली नाही. या वर्षीच्या अखेरपर्यंत करोना विषाणूवर लस मिळण्याची शक्यता वैज्ञानिकाकडून व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत जर कोणी सांगत असेल की करोनाचा उपाय एका क्षणात होई शकतो, आणि हे एखादा नेता म्हणत असेल तर…तुम्ही काय विचार कराल…? त्या नेत्याच्या या वक्तव्यावर तुम्ही विचार कराल किंवा हसाल. काँग्रेस नेत्यानं करोनावर असाच एक देशी उपाय शोधला असून करोना बरा होतो असा दावाही केला आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मंगळुरुमधील उल्लाल शहरातील काँग्रेस नेता रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गट्टी यांनी करोनावरील देशी उपचार सांगितला आहे. ते म्हणतात की, रम आणि दोन तळलेली अंड्याचं सेवन केल्यास करोनाचा पराभव केला जाऊ शकतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये रविचंद्र गट्टी करोनाला पळवण्याचं औषधं सांगत आहेत. ते म्हणतात की, ‘९० मिली रममध्ये एक चमचा काळी मिर्ची टाका. त्यानंतर त्याचं मिश्रण चांगल्या पद्धतीन करा आणि प्या. त्यासोबत दोन अंड्यांचा ऑमलेट किंवा दोन फ्राय अंडी खा.’ करोनासोबत लढण्यासठी गट्टी यांनी हा देशी फॉर्मुला सांगितला आहे. त्यांनी स्वत त्याचं सेवन केलं आहे.


रविचंद्र गट्टी आपल्या या दाव्यापाठीमागील तर्कही सांगत आहेत. गट्टी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. एक यूजर्सने लिहलेय की, करोना मरेल किंवा नाही, पण अंडे खाल्ले म्हणून आई नक्की मारेल. अन्य दुसरा एक युझर्सने लिहलेय की, अरे हिऱ्या इतक्या दिवसांपासून तू कुठे लपला होतास.