नारळ आणि सुपारीच्या झाडांवर चढणे कठीण काम आहे. मात्र कर्नाटकच्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने यावर एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. के गणपति भट्ट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भट्ट यांनी एक मोटार तयार केली आहे. या मोटारीव्दारे नारळ आणि सुपारीच्या झाडांवर चढणे सोपे झाले आहे. कर्नाटकात झाडांवर चढणाऱ्या मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच या प्रकारचे संशोधन भट्ट यांनी केले आहे.

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारवर एका वेळी एक माणूस बसू शकतो. ३० सेकंदात हे वाहन झाडावर पोहचू शकते. ही मोटार एक लीटर पेट्रोलमध्ये ८० झाडांवर चढू शकते. पावसाळ्यात सुपारी आणि नारळांच्या झाडांवर कीड लागते, त्या वेळी किटकनाशकांची फवारणी करावी लागते. किटकनाशक औषधं घेऊन इतक्या वर चढणे कधी कधी शक्य होत नाही. अशा वेळी या मोटारीचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारीमध्ये टू स्ट्रोक इजिंन असून ही मोटार खाली पडून कोणी जखमी होऊ नये यासाठी शॉक अर्ब्सोर्बेर आणि हायर्डोलीक ड्रमचा वापर करण्यात आला आहे. या मोटारीची किंमत ७५००० सांगण्यात येत आहे.