Kasba Bypoll Election Result 2023 : पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. महविकासआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या पराभवाचे विश्लेषण करू असा पवित्रा घेतला आहे. कसब्यात हेमंत रासने यांचा पराभव व धंगेकरांचा विजय, बिचूकलेंना मिळालेली ४७ मतं या एकूण पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होत आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत रासने यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला होता यावरही नेटकरी मीम शेअर करून मजा घेत आहेत. पुणेकरांच्या मीम पेजवर झळकणाऱ्या काही मजेशीर कमेंट्स पाहु या..
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2023 रोजी प्रकाशित
“बिचुकलेच बाजीगर, आता मोदीजी…” कसब्यात धंगेकरांच्या विजयानंतर ट्विटरवर पुणेरी मीम्सचा वर्षाव
Kasba Elections Memes: धंगेकरांचा विजय, बिचूकलेंना मिळालेली ४७ मतं या एकूण पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 03-03-2023 at 10:09 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba bypoll election result 2023 marathi memes trending on eknath shinde abhijit bichukle ravindra dhangekar fadnavis svs