4 Places to visit in Kedarnath India 2023 :उत्तराखंड राज्यातील केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. केदारनाथ मंदिरात दरवर्षी लाखो लोक येतात. अनेकजण मंदिरात दर्शनासह पर्यटनासाठी पोहोचतात.

पण पर्यटक जेव्हा केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचतात, तेव्हा ते मंदिरात जाऊनच परत येतात. पण तुम्हाला माहित आहे का, मंदिराच्या आजूबाजूला अशी अनेक अद्भूत ठिकाणे आहेत. जिथे गेल्यानंतर पर्यटनाचा एक वेगळाच आनंद घेता येतो.

केदारनाथ मंदिराच्या आसपास अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांना भेट दिल्यानंतर तुम्हाला पर्यटनाचा आणखी एक रोमांचकारी अनुभव मिळेल, ही ठिकाणं कोणती आहेत जाणून घेऊ.

वासुकी ताल

केदारनाथच्या आजूबाजूच्या कोणत्याही उत्तम ठिकाणाचा विचार केला तर वासुकी ताल हा पहिला येतो. या सुंदर तलावाची हिंदू पौराणिक कथा देखील प्रसिद्ध आहे.

भगवान विष्णूने रक्षाबंधनाच्या दिवशी या तलावात स्नान केले होते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या तलावाला वासुकी नावाने ओळखले जाते. हिमालय पर्वताच्या मध्यभागी वसलेल्या या तलावाचे एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. केदारनाथ मंदिरापासून हे तलाव सुमारे ८ किमी अंतरावर आहे, या ठिकाणी ट्रेकिंग करून सहज पोहोचता येते.

भैरवनाथ मंदिर

केदारनाथ मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर वसलेले भैरवनाथ मंदिर देखील एक पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. केदारनाथ मंदिरानंतर भैरवनाथ मंदिर हे केदारनाथमधील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

टेवडीच्या टोकावर वसलेले हे मंदिर पर्यटकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग करून या पवित्र मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. ट्रेकिंग करताना अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. तसेच तुम्हाला सुंदर फोटोग्राफीही करता येते.

गौरीकुंड

गौरीकुंड हे केदारनाथच्या बाजूचे भेट देण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले गौरीकुंड हे अध्यात्म आणि मोक्षाचे प्रवेशद्वार मानले जाते.

गौरीकुंडाच्या संदर्भात अशी मान्यता आहे की, देवी पार्वतीने भगवान शंकराशी विवाह करण्यासाठी गौरीकुंडमध्ये अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. हे गौरीकुंड केदारनाथ मंदिरापासून सुमारे ९ किमी अंतरावर आहे. ट्रेकिंग करून तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. या कुंडापर्यंत जातानाही तुम्हाला सुंदर दृश्य पाहण्याची एक संधी मिळेल.

चंद्रशिला गाव

केदारनाथच्या आसपास समुद्रसपाटीपासून ४ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले चंद्रशिला गाव हे एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर पर्वत, देवदार वृक्ष आणि आल्हाददायक हवामान या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात.

चंद्रशिला गाव ट्रेकिंगसोबतच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. चंद्रशिला ते चोपटा दरम्यान सुमारे ४.५ किमीचा ट्रॅक आहे. ट्रेकिंग दरम्यान हिमालयातील हजारो पर्वतरांगा आणि नंदा देवी, त्रिशूल, केदार शिखर आणि चौखंबा शिखरे पाहायला मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदारनाथ मंदिराच्या आसपास भेट देण्यासाठीची इतर ठिकाणे

या चार ठिकाणांशिवाय केदारनाथच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही आदिगुरू शंकराचार्य समाधी, त्रियुगीनारायण मंदिर, चोरबारी तलाव आणि रुद्रनाथ मंदिर यासारखी ठिकाणेही पाहता येतात. पण या ठिकाणांना भेट देण्याआधी योग्य मार्गदर्शन घेऊनच बाहेर पडा.