Best StewsIn The World : भारताला विविधतेने नटलेला देश म्हटले जाते. इथे प्रत्येक राज्याची स्वत:ची अशी एक ओळख आहे. लोकांची जीवनशैली ते खाण्यापिण्याच्या सवयी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. सर्व राज्यांतील खाद्यपदार्थांना स्वत:ची वेगळी चव, सुगंध आणि ओळख आहे. त्यामुळे केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगभरातील लोकांना भारतीय खाद्यपदार्थांनी भुरळ घातल्याचे दिसते. अनेक भारतीय पदार्थ विदेशी नागरिक आनंदाने आणि चवीने खाताना दिसतात. पण, भारतीय खाद्यपदार्थांपैकी असेच काही विशेष पदार्थ जगातील कोनाकोऱ्यात पोहोचलेत. अशाच काही जगप्रसिद्ध पदार्थांमध्ये भारतातील कोणत्या पदार्थांचा समावेश आहे ते जाणून घेऊ…
taste atlas यांच्या वतीने २०२४ या वर्षातील जगभरातील विविध देशांमधील ५० बेस्ट स्ट्यू पदार्थांची यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत भारतातील जवळपास नऊ पदार्थांचा समावेश आहे. ही भारतीयांसाठी नक्कीच अभिमान अन् आनंदाची गोष्ट आहे. बहुतेक मांसाहारी लोकांना खिमा पाव आवडतो. टेस्ट अॅटलसच्या यादीत खिमा सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर बंगाली डिश चिंगारी मलाई करी १८ व्या स्थानी, तर कोरमा २२ व्या आहे.
कोबीची भाजी खाऊन कंटाळलात? संकष्टीनिमित्त करा ‘कोबीची खमंग वडी’; पटकन नोट करा सोपी रेसिपी
त्यानंतर गोवा आणि कोकणातील प्रसिद्ध पदार्थ विंदालू २६ व्या स्थानी आहे. अनेक भारतीयांचा आवडता पदार्थ दाल तडका ३० व्या स्थानी, साग पनीर ३२ व्या स्थानी, शाही पनीर ३४ व्या, मिसळ ३८ व्या व शेवटी दाल ५० व्या स्थानावर आहे.
भारतातील कानाकोपऱ्यातील म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम पदार्थांचा या यादीत समावेश आहे. त्यातून भारतीय खाद्यसंस्कृतीमधील विविधता पाहायला मिळत आहे. taste atlas ने यापूर्वीही जगभरातील गोड, तिखट अशा विविध प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या याद्या जाहीर केल्यात. यातून आपल्याला जगभरातील लोक भारतातील कोणते पदार्थ आवडीने खातात याची माहिती मिळते.