देशात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याच्या अनेक घटना समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मागेच कुत्र्यांनी दोन विद्यार्थ्यांचा पाठलाग केल्याची घटना केरळच्या कन्नूर येथे घडली होती. यात दोन्ही मुलांमागे कुत्र्यांची टोळी लागली होती. या घटनेत मुले थोडक्यात बचावली होती.

कुत्रांच्या हल्ल्यांमुळे केरळमध्ये आधीच संतापाचे वातावरण पसरले आहे. हा संताप आता प्रत्यक्ष दिसून आला आहे. केरमधील एका व्यक्तीने मुलांच्या सुरक्षेसाठी चक्क हत्त्यार हाती घेतल्याचे समोर आले आहे.

(Viral : हिंसक श्वानांपासून थोडक्यात बचावले विद्यार्थी, पाहा व्हिडिओ..)

हातात एअर गन घेऊन मुलांना नेले

ट्विटरवर अगोर्ल इथाना नावाच्या एका युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात समीर नावाचा एक व्यक्ती हातात एअर गन घेऊन मुलांना घेऊन जाताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांपासून मुलांची सुरक्षा करण्यासाठी त्याने हातात बंदूक घेतल्याचे समजले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी व्हिडिओतील बंदूक पकडलेल्या समीरविरुद्ध भादवीच्या कलम १५३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. समीर हा कासारगोड जिल्ह्यातील बकाल येथील रहिवासी आहे. दरम्यान आपण पकडलेल्या बंदुकीने कुठल्याही श्वानाला नुकसान होणार नाही, असा दावाही त्याने केला आहे.

(चित्त्यांना आणण्यासाठी आफ्रिकेत पोहोचले विशेष भारतीय विमान, पुढचा भाग पाहून चित्त्यांची उडेल घाबरगुंडी)

श्वानांना मारणे हा उपाय नाही – मुख्यमंत्री विजयन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केरळमध्ये श्वानांच्या हल्ल्यांवर राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र, त्यांची हत्त्या करणे हा योग्य पर्याय नसल्याचे ते म्हणाले. कुत्र्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. श्वानांना मारून ही समस्या सुटणार नाही. समस्या सोडवण्यासाठी सरकारने राबविलेल्या वैज्ञानिक उपयांना सर्वसामान्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. हे संकट सोडवण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री विजयन म्हणाले.