King Cobra Attack Video : सध्या पावसाळा असल्याने सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे साप बाहेर पडून लोकवस्तीत शिरताना दिसतात. यात काही दुर्मिळ साप तर काही विषारी साप पाहायला मिळतात. अनेकदा साप वस्तीत शिरुन लहान प्राण्यांची शिकार करतानाही दिसतात. सध्या किंग कोब्राचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एका भुकेलेल्या कोब्राने असे काही केले की पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दरम्यान अनेकांना हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.
व्हायरल व्हिडिओ एका गावातील आहे, जिथे पावसामुळे सर्वत्र ओलावा दिसतोय. याचवेळी एक भलामोठा किंग कोब्रा ज्याने दोन मोठ्या बेडकांना गिळल्याचे दिसतेय. पण काहीवेळाने इतके मोठे भक्ष्य गिळल्याने त्याला श्वास घेणं अवघड होऊ लागतं, अस्वस्थ वाटू लागते. अशा परिस्थितीत किंग कोब्रा सरपटण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला शरीर जड झाल्यामुळे अशक्य होते.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कोब्राने दोन मोठ्या बेडकांना शिकार बनवले. तो खूप भूकेलेला असल्याने त्याने एकाच वेळी दोन बेडकं गिळली असावी असा अंदाज आहे. पण यामुळे त्याची अवस्था फार वाईट होते, तो पुढे नीट सरपटू देखील शकत नाही. शेवटी न राहून त्याला दोन्ही बेडकांना पोटातून बाहेर काढावे लागते. व्हिडीओत पाहू शकता, किंग कोब्रा गिळलेली दोन्ही बेडकं तोंडावाटे पुन्हा बाहेर काढतोय. हे दृश्य पाहताना फार भयानक दिसतेय. हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर cobra_lover_suraj नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्याता आला आहे. जो हजारो लोकांनी लाईक केला तर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, भाईसाहेब म्हणतात ना की, गरजेपेक्षा जास्त खाऊ नये. तर दुसऱ्याने लिहिले की, बेडूक पाहिल्यानंतर त्याच्या मनात लोभ वाढला असेल आणि त्यानंतर त्याची अवस्था अशी झाली असेल. तिसऱ्याने लिहिले की, म्हणूनच असे म्हटले जाते की अति लोभ ही वाईट गोष्ट आहे.