मुंगूस हा लहान पाय असलेला लहान प्राणी आहे परंतु तो एक भयंकर स्नेक फाइटर म्हणूनही ओळखला जातो. किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि तो २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत माणसांना मारू शकतो. अशा खतरनाक सापाशी झुंज देण्याची हिंमत जंगलात जवळपास कुणीच करत नाही. पण मुंगूस हा प्राणी मोठ्या हिंमतीने किंग कोब्राशी सामाना करू शकतो. पण, किंग कोब्रा त्यांच्या कट्टर शत्रू मुंगूसला घाबरतो, हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. असं का?

मुंगूस विषारी सापाच्या प्राणघातक हल्ल्यापासून वाचू शकतो आणि त्याच्याशी ७० ते ८० टक्के लढाईत तो नेहमी जिंकतो. भारतीय राखाडी मुंगूस विशेषतः कोब्रासारख्या विषारी सापांशी लढण्यासाठी आणि खाण्यासाठी ओळखला जातो. मग कल्पना करा की, या दोघांमधल लढत किती भयंकर असू शकते. सध्या दोघांच्या अशाच एक भयंकर लढतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मुंगूस आणि किंग कोब्रा हे दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांशी लढत राहतात. पण या लढतीत नक्की कोण बाजी मारतं आणि कोण हारतं हे या व्हिडीओमध्ये पाहणं फारच रंजक ठरत आहे.

या व्हिडीओमध्ये एक किंग कोब्रा एका भारतीय राखाडी मुंगूसशी जोरदार लढा देत आहे. असं दिसतं की किंग कोब्रा मुंगूसच्या क्षेत्रात घुसला आणि मुंगूसच्या समोरासमोर आला. मुंगूस आणि किंग कोब्रा एकमेकांवर हल्ला करताना आणि एकमेकांना चकमा देताना दिसतात. मुंगूस शेवटी सापाला तोंडात पकडतो. कोब्रा इकडे तिकडे फिरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पण पुढच्या काही सेकंदात मुंगूस या लढाईचा शेवट करतो. या किंग कोब्राला मुंगूसने आपल्या जबड्यात पकडून ठेवला आणि अखेर ही लढाई मुंगूस जिंकतो.

आणखी वाचा : एकच नंबर! संधिवात असलेल्या कुत्र्यासाठी चक्क अशी लिफ्ट बनवली! VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्मोकिंग करणारा पक्षी तुम्ही कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ animal.world_and_nature नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लोक तो मोठ्या प्रमाणात पाहाताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ५३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याच व्हिडीओला युट्यूबवर १.१. मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ मोठ्या उत्सुतेने पाहत आहेत. तसंच भरभरून प्रतिक्रिया देत या लढाईवरील आपल्या भावना व्यक्त करत आहेत.